मुंबई

नवी मुंबई बाजारपेठेत नवचैतन्य

CD

तुर्भे, ता. १८ (बातमीदार) : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नवी मुंबईतील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी, गुढी उभारण्यासाठी साखरेचे हार, कंगण, रेडिमेड गुढ्या, तसेच तांब्याच्या व चांदीच्या कलशांनी बाजारपेठ सजली आहे. यासोबतच पाडव्याचा मुहूर्त साधून अनेक जण सोने, वाहन ‌किंवा इतर वस्तू खरेदीच्या बेतात असतात. यासाठी विविध शोरूम सजली असून, वेगवेगळ्या सवलती देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

गुढीला शोभा येते ती मंगल कलशामुळे. तांब्याचा मंगल कलश गुढीला बांधला जातो. चांदीचा थर असलेले व चांदीचे गडू बाजारपेठेत आले आहेत. तांब्याच्या कलशाचे पूजेसाठी महत्त्व असल्याने हे कलश खरेदीला नागरिकांची पसंती असते. तसेच चांदीचे कलशदेखील काही जण खरेदी करतात, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तांब्याचे कलश २०० ते १००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच गुढी उभारण्यासाठी ब्लाऊज पीस, साडी अशी वस्त्रे वापरली जात असल्याने भरजरी आणि जरीकाठ असलेल्या गुढीसाठी साड्याही बाजारात उपलब्ध झाल्या आहेत, तर ब्लाउज पीसदेखील अनेक प्रकारात उपलब्ध आहेत. १०० रुपयांपासून वस्त्रांचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. गुढीसाठी लागणाऱ्या साखरेच्या माळादेखील विविध रंगात विक्रीसाठी आल्या आहेत. त्यात साधी माळ व चंपाकळी असे दोन प्रकार असतात. साखरेची माळ २० ते ७० रुपयांना मिळत आहे.

सवलतींचा भडिमार
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी मोठी झुंबड उडते. पाडव्याचा मुहूर्त साधत इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, सोन्याचे दागिने, बाइक व कारच्या शोरूम सजल्या आहेत. गुढीपाडव्यालाच कार किंवा बाइक घेता यावी यासाठी अनेकांनी आधीपासूनच बुकिंग करून ठेवली असून, काही जण याचदिवशी खरेदीला पसंती देण्याची शक्यता असल्याने शोरूम मालकदेखील सज्ज झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT