मुंबई

खोपोली नगर परिषदेची विशेष सभा संपन्न. दिव्यांग पेन्शन मध्ये पाचशे रुपये वाढ

CD

दिव्यांग पेन्शनमध्ये ५०० रुपयांनी वाढ
खोपोली नगर परिषदेच्या विशेष सभेत निर्णय
खालापूर, ता. १८ (बातमीदार) ः खोपोली नगर परिषदेच्या विशेष सभेत विविध लोकहितार्थ निर्णय घेण्यात आले असून. दिव्यांग बांधवांना पेन्शनमध्ये ५०० रुपये प्रतिमहा इतकी वाढ करण्यात आली आहे. यानुसार दरमहा १,२५० इतकी पेन्शन दिली जाणार आहे. यामुळे दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला आहे.
खोपोली नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १७) पार पडली. यामध्ये नगर परिषदेचा नुकताच २३७.५० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. या सभेसाठी उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, मुख्याधिकारी पंकज पाटील, सर्व विषय समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. आमदार महेंद्र थोरवे यांच्या शिफारशीनुसार साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती उपयोजनेतील विविध कामांनाही हिरवा कंदील दाखवण्यात आला.

प्रमुख निर्णय
१. मालमत्ताधारकांना शास्तीमध्ये ५० टक्क्यांची सूट देण्यात आली आहे.
२. प्रभाग क्रमांक १० मधील उमरजी पटेल नगर येथील श्रीराम मंदिराशेजारील सामाजिक सभागृहाच्या कामास मंजुरी देण्यात आली.
३. गगनगिरी महाराज आश्रमासमोरील रस्ताविकास योजनेप्रमाणे १८ मीटर रुंदीकरणाच्या प्रस्तावास मंजुरी दिली.
४. हनुमान मंदिर ते गूड लक चौक रस्ता दुभाजकावर वृक्षलागवड करणे
५. सामाजिक बांधिलकी निधीतून विविध शाळांवर सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

SCROLL FOR NEXT