मुंबई

वाशीमध्ये हायड्रो गांजा विक्रीसाठी आलेला तरुण अटकेत

CD

वाशीत हायड्रो गांजासह तरुण अटकेत
पावणेतीन लाखांचे अमली पदार्थ जप्त

नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : वाशी परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून हायड्रो गांजासह दुचाकी, मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दीपम रवींद्र तापसे (२७) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून पावणेतीन लाख रुपये किमतीचा हायड्रो गांजा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय दुचाकी, मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण चार लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

महात्मा जोतिबा फुले स्मृती भवन परिसरातील गल्लीत एक तरुण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, १८ मार्च रोजी रात्री सुमारे पावणेनऊच्या सुमारास सेक्टर तीनमध्ये पोलिसांनी सापळा रचला. या वेळी दीपम तापसे हा संशयास्पदरीत्या येताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडे दोन लाख ७५ हजार रुपये किमतीचा २६ ग्रॅम हायड्रो गांजा सापडला.

याशिवाय त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीची दुचाकी, ७५ हजार रुपये किमतीचा आयफोन १५ प्लस आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

मशीद शेख यांची महाराष्ट्र केसरीत दमदार कामगिरी; सुवर्णपदकासह बुलेट आणि रोख पारितोषिकावर नाव कोरले

मोखाड्यात "घर घर संविधान" उपक्रमांतर्गत भीमगीतांची जल्लोषात मैफिल; लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीवर नाराजी

LPG Crisis: ऊर्जा संकटात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! LPG पुरवठ्यात 20% वाढ; वाटप 50% पर्यंत वाढवले, राज्यांना दिलासा

Latest Marathi News Live Update : सहा आमदारांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले

SCROLL FOR NEXT