Josh Inglis
esakal
Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Cricket Update: लखनौ सुपर जायंट्सकडे इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये आता गमावण्यासारखे काहीच नाही, परंतु चेन्नई सुपर किंग्सकडे प्ले ऑफची संधी अजून आहे. त्यामुळे घरच्या मैदानावरील लढतीत विजय मिळवून CSK तालिकेत आगेकूच करण्याच्या प्रयत्नात आहे. हेड टू हेड विक्रम पाहिल्यास LSG ३-२ असे आघाडीवर आहेत. मात्र, या पर्वात लखनौला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही आणि १० सामन्यांत ते फक्त ३ विजय मिळवू शकलेले आहेत. तेच CSK ने १० सामन्यांत ५ विजय मिळवले आहेत.