मुंबई

एक लाख फेरीवाल्यांच्या व्यवसायाचा मार्ग मोकळा

CD

एक लाख फेरीवाल्यांच्या व्यवसायाचा मार्ग मोकळा
बांगलादेशींची पडताळणी करा; उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. २३ : मुंबईतील सर्व अनधिकृत ज्यामध्ये बांगलादेशी किंवा परदेशी फेरीवाल्यांचाही समावेश असेल, त्याची सखोल पडताळणी करा, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. २३) महापालिकेला दिले. तसेच यापूर्वीच पात्र ठरलेल्या ९९,४३५ विक्रेत्यांना कायदा आणि मार्गदर्शक तत्त्वानुसार आपला व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगीही न्यायालयाने दिली.

मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांसंदर्भात न्यायालयाने स्वतःहून दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना मुंबई महापालिका आणि पोलिसांना फेरीवाला व्यवसायात गुंतलेल्या सर्व व्यक्तींच्या ज्यामध्ये कथित बांगलादेशी किंवा इतर बिगर-भारतीय नागरिकांचा समावेश आहे, अशा फेरीवाल्यांचे सहाय्यक किंवा मदतनीस म्हणून काम करतात, त्यांच्याही ओळखी पटवून तातडीने पडताळणी करावी, असे आदेश न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने दिले.  मुंबईतील सर्व प्रकारचे स्टॉल्स मग ते कायमस्वरूपी असोत, तात्पुरते, फिरते किंवा वाहनांवर आधारित सगळ्यांची सविस्तर तपासणी करावी, हे फेरीवाले वाहतुकीस किंवा पादचाऱ्यांसाठी अडथळा निर्माण करतात की नाही, याचा विचार न करता ही तपासणी करण्यात यावी, असेही न्यायालयाने प्रामुख्याने आदेशात नमूद केले.

योग्य कारवाई करा!
एखादी व्यक्ती अनधिकृत स्थलांतरित असल्याचे आढळून आल्यास, कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, ज्यामध्ये सक्षम प्राधिकरणांमार्फत संबंधित व्यक्तीला परत पाठवण्याच्या  उपाययोजनांचाही समावेश असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच न्यायालयाच्या या आदेशाचे पालन न केल्यास किंवा कर्तव्यास कसूर झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जाईल, असा इशाराही न्यायालयाने दिला.


व्यवसायास परवानगी
न्यायालयाने यापूर्वीच पात्र घोषित केलेल्या ९९,४३५ फेरीवाल्यांना, मार्गदर्शक तत्त्वांनुसारच काटेकोरपणे व्यवसाय करण्याची परवानगी न्यायालयाने दिली तर उर्वरित २९,००८ अर्जदारांची चार महिन्यांत पडताळणी करावी आणि ते पात्र आढळले, तर त्यांना केवळ विशिष्ट जागांवर किंवा क्षेत्रांमध्येच व्यवसायाची परवानगी दिली जाऊ शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या दोघांव्यतिरिक्त इतर कोणत्याही फेरीवाल्याला फेरी व्यवसाय करण्याची परवानगी मिळणार नाही; तसेच ज्यांना परवानगी मिळेल त्यांनीही केवळ मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केल्यासच हा व्यवसाय सुरू ठेवता येईल. इतर सर्व फेरीवाल्यांना तत्काळ हटवण्यात यावे, असे न्यायालयाने आपल्या ५६ पानांच्या सविस्तर निकालात नमूद केले आहे.


निवडणुका वैध
न्यायालयाने २९ ऑगस्ट २०२४च्या ‘नगर फेरीवाला समिती’च्या (टीव्हीसी) निवडणुका वैध ठरवत त्यास मान्यता दिली आणि त्यांचे निकाल तत्काळ जाहीर करण्याचे आदेश दिले. फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी त्याच्या मूळ उद्देशानुसार करण्यासाठी ‘टीव्हीसी’ने सर्व आवश्यक पावले उचलावीत, असेही नमूद करताना मतदार यादीत किंवा निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने मनाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एक पेन ड्राइव्ह तपासायला किती वेळ लागतो? २४ तासांत अहवाल द्या, हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं

Udgir Crime : जेवणाच्या बहाण्याने घरात घुसून महिलेवर अत्याचार; आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

युद्धामुळे महागाईचा भडका, सरकारने एक कोटीची नोट छापली, पण बाजारात पिशवीही भरणार नाही; इराणची अर्थव्यवस्था संकटात

विजय वडेट्टीवार यांच्यावर शंभर कोटींच्या मानहानीचा दावा; कुणी दाखल केली याचिका? नेमकं प्रकरण काय?

SRH Viral Video: सिलेक्टर्स ऐकतायेत, जरा सांभाळून... इशान किशनची सर्वांसमोर नितीश रेड्डीला वॉर्निंग; अभिषेक शर्मालाही लागला हसू

SCROLL FOR NEXT