

Disha Salian Case Mumbai High Court Asks State to Submit Report Within 24 Hours
Esakal
अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील याचिकेवर अंतिम अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य सरकारवर उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. २३) ताशेरे ओढले. नवे पुरावे सापडले ही सबब सांगून अंतिम अहवाल सादर करणार नाही का? कायद्यानुसार तुम्ही २४ तासांत अहवाल सादर करायला हवा, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले.