वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मृणाल जाधवचा जामीन अर्ज फेटाळला
डोंबिवली, ता. २३ : प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या बदलापूर येथील मृणाल जाधव हिचा जामीन अर्ज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे सध्या ती न्यायालयीन कोठडीत असून, तिची आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मृणाल जाधव हिने आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला होता. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात मोठा गदारोळ झाला. विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर बदलापूर पोलिसांनी तिला अटक केली. याप्रकरणी अंबरनाथ न्यायालयाने आधीच जामीन नाकारला होता. सोमवारी झालेल्या सुनावणीत फिर्यादीच्या बाजूने मांडलेले युक्तिवाद ग्राह्य धरत सत्र न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.