मुंबई

नालासोपाऱ्यात ठिणगी! रामनवमीच्या मिरवणुकीत पोलीस-भाविकांमध्ये झटापट, नेमकं काय घडलं?

CD

मिरवणुकीत पोलिस-भाविकांमध्ये झटापट

नालासोपारा, ता. २७ ः नालासोपाऱ्यात रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य रॅलीदरम्यान पोलिस आणि आयोजकांमध्ये जोरदार वादावादी झाल्याची घटना गुरुवारी (ता. २७) घडली. या वादात पोलिसांनी लाठी चार्ज केल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. या वेळी संतप्त आयोजकांनी भररस्त्यात ठिय्या मांडला होता. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
नालासोपारा पूर्वेतील ओसवालनगरी सर्कल येथून रामनवमीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. ही शोभायात्रा रहमतनगर परिसराकडे जात असताना पोलिसांनी शोभायात्रेच्या मार्गाबाबत आक्षेप घेतला आणि यात्रा काही काळ थांबवून ठेवली. शोभायात्रा मार्गस्थ करण्यावरून पोलिस अधिकारी आणि आयोजकांमध्ये बाचाबाची झाली. पाहता पाहता या वादाचे रूपांतर धक्काबुक्की आणि राड्यात झाले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आयोजक आणि पोलिस समोरासमोर आले तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. पोलिसांच्या या कारवाईमुळे शोभायात्रेत आलेल्या भाविकांमध्ये मोठी धावपळ उडाली. या प्रकारामुळे संतापलेल्या भाविकांनी रस्त्यावरच बसून जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासनाचा निषेध केला. यामुळे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला होता. परिस्थिती आणखी बिघडू नये, यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने अतिरिक्त पोलिस बल मागवले. सध्या नालासोपाऱ्यातील संबंधित परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिसराला एका अर्थाने छावणचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Katraj News : भारती विद्यापीठ भागात हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भडका; चारजण जखमी

SCROLL FOR NEXT