वसई नगरीत साहित्यप्रेमींचा जल्लोष
ग्रंथोत्सव उपक्रमांतर्गत प्रदर्शनाला प्रतिसाद
वसई, ता. २८ (बातमीदार)ः मराठी भाषेविषयी जागृतीच्या हेतूने शासन स्तरापासून गावपाड्यात उपक्रम सुरू आहेत. याच अनुषंगाने वसई शहरात ग्रंथोत्सव उपक्रमांतर्गत भरवलेल्या दोनदिवसीय प्रर्दशनाला साहित्यिक, लेखक, कवी, साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य (मुंबई) वसई-विरार शहर महापालिका जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पालघर आणि मनोहर वाचनालय, माणिकपूर (वसई जि. पालघर) यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर ग्रंथोत्सव वसईच्या माणिकपूर येथे पार पडला. यानिमित्त दोनदिवसीय ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीतून करण्यात आली. या वेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथकात सहभाग घेतला. ढोलताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषेत वसईच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिका वीणा गव्हाणकर, ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, महापौर अजीव पाटील, आदिवासी क्षेत्र आढावा समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विवेक पंडित, आमदार स्नेहा दुबे, आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, उपमहापौर मार्शल लोपीस, विरोधी पक्षनेता मनोज पाटील उपस्थित होते.
------------
वाचन म्हणजे नुसता डोळ्याचा व्यायाम नसून मेंदूचा व्यायाम आहे. ग्रंथालयातील चांगल्या दर्जाची पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
- वीणा गव्हाणकर, ज्येष्ठ साहित्यिका
------------
नाटकात संवादासाठी वाचन अत्यंत महत्त्वाचे असते. वसईत राबवली जाणारी वाचन चळवळ खरोखरच कौतुकास्पद आहे.
- अशोक समेळ, ज्येष्ठ रंगकर्मी
-------------
शहरातील साहित्य, कला क्षेत्राच्या वाढीसाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. साहित्य, कलेचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी पालिका कटिबद्द आहे. फिरते वाचनालय करण्याचा मानस आहे.
- अजीव पाटील, महापौर
------------
शहरात पुस्तके, ग्रंथ, इतर साहित्य विक्रीची दुकाने असावी. त्यांना पालिकेमार्फत सहाय्य मिळावे, जेणेकरून वाचकांची संख्या वाढेल.
- स्नेहा दुबे, आमदार, वसई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.