

Russia Export Ban on Petrol Sparks Global Concern Over Fuel Supply
Esakal
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश असलेल्या रशियाने मोठा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारात रशियाच्या या निर्णयाने खळबळ उडालीय. रशिया सरकारने अधिकृत घोषणा केलीय की एक एप्रिलपासून गॅसोलिन (पेट्रोल) निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली जाणार आहे. मध्य पुर्वेत सुरू असलेल्या यु्दधामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला आहे. युद्दामुळे कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. आता यातच रशियाने घेतलेल्या निर्णयाचा फटका रशियावर अवलंबून असलेल्या देशांना बसणार आहे. यात तुर्की, चीन, ब्राझील, आफ्रिका आणि सिंगापूर या देशांचा समावेश आहे.