मुंबई

उलवेतील अनंता टॉवर रहिवाशांचा पाण्यासाठी ‘हंडा मोर्चा

CD

उलवेतील रहिवाशांचा पाण्यासाठी ‘हंडा मोर्चा’
सिडकोकडून लेखी आश्वासन मिळाल्याने तात्पुरता दिलासा
उलवे, ता. २८ (बातमीदार) : उलवे येथील बामणडोंगरी परिसरातील रहिवाशांनी पाणीटंचाईच्या तीव्र समस्येविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. रहिवाशांनी शुक्रवारी (ता. २७) सिडको कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. भरउन्हात पाण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र या वेळी पाहायला मिळाले. सिडको प्रशासनाकडून काही मागण्या लेखी स्वरूपात मान्य करण्यात आल्याने रहिवाशांनी तूर्तास आंदोलन मागे घेतले आहे.
अनंता टॉवरमधील रहिवाशांना गेल्या एक वर्षापासून अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. रहिवाशांच्या तक्रारीनुसार, सिडकोकडून पुरेसे पाणी मिळत नाही. तसेच सोसायटीत टीटीपी प्लांट कार्यान्वित नसल्याने फ्लश आणि स्वच्छतेसाठी पाणी उपलब्ध होत नाही. वारंवार पाठपुरावा करूनही सिडको प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सिडको हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष अजय हेगडकर यांनी केला आहे. याविरोधात रहिवाशांनी सिडको कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. यानंतर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी रहिवाशांशी चर्चा केली आणि काही मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, सिडकोने या आश्वासनांची वेळेत पूर्तता न केल्यास पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवासी संघटनेने दिला आहे. आवश्यक असल्यास बेलापूर येथील सिडको भवनवर धडक मोर्चा काढण्यात येईल आणि महारेराकडे कायदेशीर तक्रार दाखल केली जाईल, असा इशाराही नागरिकांकडून दिला आहे.

दैनंदिन पाणीपुरवठ्यावर नियमित देखरेख ठेवून बिघाडाच्या काळात टँकरची सुविधा देण्याचे आणि नवीन जलवाहिनीचे (फेज १) काम २० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येईल, तर टर्शरी ट्रीटमेंट प्लांट ३० एप्रिलपर्यंत कार्यान्वित करून त्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी १५ मेपर्यंत पूर्ण केली जाईल, अशा काही महत्त्वाच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या.
- अर्जुन अनुसे, अधीक्षक अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price Today: पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर; पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात आज किती भाव?

Latest Marathi News Update : चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी

Uddhav Thackeray INDIA Alliance : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार?, ठाकरेंच्या सवालाने दिल्लीतील बैठकीत नाराजीचे सूर

Donald Trump : मैत्रीत दुरावा ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना इराण हल्ल्यावरुन कडक इशारा, नेमकं काय घडलं?

राऊत-देशमुख चौथ्यांदा भेट; मित्रासाठी मालक मैदानात, विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा, मैत्रीची साथ अन् पक्षनिष्ठेचा संदेश..

SCROLL FOR NEXT