वाशी परिसराचा निलेश म्हात्रेंचा पाहणी दौरा
तुर्भे, ता २९ (बातमीदार) ः वाशी परिसरातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी माजी नगरसेवक निलेश म्हात्रे यांनी रविवारी (ता. २९) मिनी सी-शोरसह विविध ठिकाणांचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
निलेश म्हात्रे यांनी वाशी परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेत सखोल पाहणी दौरा केला. या दौऱ्यात वाशी जुहू चौपाटी (मिनी सी-शोर), होल्डिंग पाँड, सागर विहार (सेक्टर ८) आणि सेक्टर १०-ए आणि सेक्टर ८ मधील सुरू असलेल्या कॉंक्रीट रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता पंढरीनाथ चौरे, विभाग अधिकारी सुखदेव येडवे, माजी नगरसेवक राजू शिंदे, भाजप वाशी मंडळ अध्यक्ष विकास सोरटे, विक्रम पराजुली, रामकृष्ण अय्यर, निलेश भगत, प्रथमेश पाटील आदी उपस्थित होते.
मिनी सी-शोर आणि सागर विहार परिसरात जॉगिंग ट्रॅकवरील पेव्हर ब्लॉक्सची दुरवस्था, मच्छर व डास नियंत्रणासाठी नियमित धुरीकरण, होल्डिंग पाँडची स्वच्छता व निर्जंतुकीकरण या बाबींवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आसनव्यवस्था, गझेबो गार्डन, कॅन्टीन, हायमास्ट लाईट्स यांसारख्या सुविधांबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या माध्यमातून आगरी-कोळी बांधवांसाठी अधिक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.