मुंबई

नागाच्या दंशाने तीन कुत्र्याचा दुदैवी मृत्यू

CD

नागाच्या दंशाने तीन श्वानांचा मृत्यू
कल्याणच्या गंधारी परिसरातील घटना
कल्याण, ता. ३१ (वार्ताहर) : वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे सरपटणारे प्राणी गारव्यासाठी मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. कल्याण पश्चिमेतील गंधारी परिसरातील एका गॅरेजमध्ये साडेपाच फूट विषारी नागाने केलेल्या दंशामुळे तीन श्वानांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते; मात्र सर्पमित्राने नागाला सुरक्षित पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडले आहे.

कल्याण पश्चिमेतील मुन्ना गॅरेज येथे सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मालक मुन्ना यांना साडेपाच फूट नाग दिसला. नागाला पाहताच गॅरेजमधील कामगारांची मोठी पळापळ झाली. तत्काळ सर्पमित्र दत्ता बोंबे यांना पाचारण करण्यात आले. सर्पमित्र पोहोचण्यापूर्वीच, गॅरेजमधील तीन श्वान आणि नाग यांच्यात जोरदार संघर्ष झाला. यात नागाने केलेल्या विषारी दंशामुळे तिन्ही श्वानांचा जागीच मृत्यू झाला.

सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी घटनास्थळी धाव घेत अत्यंत कौशल्याने त्या विषारी नागाला जेरबंद केले. त्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास टाकला. पकडलेल्या नागाला वन विभागाच्या सूचनेनुसार नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून जीवदान देण्यात आले. वातावरणातील वाढती उष्णता पाहता, नाग गारव्यासाठी किंवा उंदराच्या शोधात गॅरेजमधील बिळाच्या आसऱ्याला आला असावा. अशा वेळी नागरिकांनी स्वतःहून सापाला मारण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

Ghodegaon News : घोडेगावच्या पाणी साठवण तलावात बुडून तीन मुले ठार; दहा वर्षिय रिहान शेख बचावला

Team India Schedule: भारताच्या वेळापत्रकात आणखी एक दौरा... वैभव सूर्यवंशीला या संघात नक्की जागा मिळणार

Pune News : पुणे महापालिकेच्या तिजोरीत ५ हजार ३२६ कोटी; मिळकतकरातून २,९८५ कोटी, तर बांधकाम करातून २,३४१ कोटी

SCROLL FOR NEXT