डाेंबिवलीत तरुणीवर
लैंगिक अत्याचार
तीन रिक्षाचालकांना अटक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : रिक्षाचालक मित्राने पार्टीच्या बहाण्याने खाेलीवर नेऊन २२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना डाेंबिवलीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी टिळकनगर पाेलिसांनी तीन रिक्षाचालकांना अटक केली आहे. उमेश वर्मा (वय ४०), चेतन चव्हाण आणि हेमंत चव्हाण (२६) अशी त्यांची नावे असून, त्यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने ४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पीडित तरुणी ही सुरक्षा रक्षकाचे काम करते. दोन महिन्यांपूर्वी तिची रिक्षाचालक चेतनशी ओळख झाली होती. २६ मार्चला तिला चेतनचा फोन आला. त्याने तिला पार्टीसाठी दुर्गाडी येथे बाेलावले. तेथे चेतन हा त्याचा मित्र हेमंतच्या रिक्षातून आला. तरुणीला घेऊन जात असताना त्यांनी मद्याच्या बाटल्या खरेदी केल्या. वाटेत ९० फुटी राेडवर त्यांनी हेमंतचा मावस मामा उमेश याला साेबत घेतले आणि ते खंबाळपाडा येथील एका नवीन इमारतीतील खोलीत गेले, अशी पाेलिसांनी माहिती दिली. तिघांनी तिला दारू पाजल्यानंतर उमेश याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तिने विराेध करताच तिला शिवीगाळ आणि मारहाण करून तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. चेतन व हेमंत यांनी तिचे हात पकडून व तोंड दाबून या कृत्यात मदत केली. त्यानंतर तिला घराजवळ सोडून पळ काढला, असे पाेलिसांनी सांगितले. तरुणीने दुसऱ्या दिवशी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर २८ मार्चला तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला हाेता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय गणगे यांच्या पथकाने त्यांना अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.