मुंबई

पाणी नियोजनासंदर्भात पाणी परिषद घेणार - महापौर नितीन पाटील

CD

पाणीप्रश्नावर राजकारण नको
महापौर नितीन पाटील यांचा विरोधकांना दणका

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २ : पनवेल महापालिकेच्या पहिल्याच महासभेत पाणीप्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधकांनी सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता, महापौर नितीन पाटील यांनी पाणीप्रश्न हा जिव्हाळ्याचा आहे, त्यावर राजकारण करू नका, असे सुनावले. तसेच, महापौरांनी येत्या १५ दिवसांत विशेष पाणी परिषद घेण्याचे जाहीर केले.
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडलेल्या सभेत विरोधी पक्षाने पाणीटंचाईविरोधात आंदोलन केले. यावरून महापौरांनी तीव्र संताप व्यक्त केला. सभागृहात लोकप्रतिनिधींना आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असतो; मात्र प्रेक्षक गॅलरीतून घोषणाबाजी करणे हीन राजकारण आहे. काही म्हणणे असेल तर महापालिका प्रशासन कार्यालयात निवेदन द्यावे, ही महासभा असल्याने निदर्शने करणे संयुक्तिक नाही, तसे केल्यास कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
अर्धा तास पाणीप्रश्नावर चर्चा झाली. यामध्ये नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, ॲड. मनोज भुजबळ, प्रवीण पाटील, रामदास शेवाळे, अजय बहिरा, अमर पाटील, विजय खानावकर, लतीफ शेख व इतर नगरसेवकांनी या चर्चेत सहभाग घेतला. त्यांनी आपापल्या भागातील पाण्याची स्थिती मांडतानाच उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. डॉ. अरुणकुमार भगत यांनी पनवेलच्या पाणीपुरवठ्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी न्हावा-शेवा टप्पा योजनेचा सातत्याने पाठपुरावा केल्याचे नमूद करून दरमहा त्याचा आढावा ते घेत असल्याचे नमूद केले.

शिलार धरण प्रकल्पावर भर
सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार यांनी सांगितले, की पनवेल महापालिकेला दरदिवशी २५८ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. सध्या २१८ एमएलडी पाण्याचा पुरवठा होत आहे. देहरंग धरण, एमजेपी, सिडकोकडून पनवेलला पाणीपुरवठा होत असतो. पुढील २५ वर्षांचा विचार करून प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य शासनाकडे पाण्यासाठी पाठपुरावा केला, त्या अनुषंगाने शिलार धरण प्रकल्प उभारला जाणार आहे. तसेच, या प्रकल्पाचा भुर्दंड महापालिकेवर येऊ नये, यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे फक्त शॉर्ट टर्म नाही तर लाँग टर्मचा विचार करून उपाययोजना केली जात आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

पोलिस आयुक्तांचे आवाहन..! गुन्हा दाखल झाल्यावर उद्‌ध्वस्त होईल भविष्य; ‘डीजे’ला कोणालाही नसणार परवानगी, वाचा...

KKR vs SRH Live : भाई, नेमकं RUN OUT कोण झालं? अंगकृश रघुवंशीला मलिंगाकडून धक्काबुक्की; पुढच्याच चेंडूवर झाला कांड...

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

SCROLL FOR NEXT