मुंबई

सिडकोचा बडतर्फ अधिकारी व त्याच्या पत्नीवर अपसंपदेचा गुन्हा दाखल

CD

बडतर्फ अधिकाऱ्यावर अपसंपदेचा गुन्हा
उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याचे चौकशीत उघड

नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : सिडकोतील बोगस कर्मचारी वेतन घोटाळ्यातील मुख्य आरोपी सागर मदनलालजी तपाडिया याने आपल्या पदाचा गैरवापर केला. तसेच पत्नीच्या नावावर कोट्यवधी रुपयांची अवैध मालमत्ता जमा केल्याचे लाचलुचपत विभागाच्या (एसीबी) तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी नवी मुंबई एसीबीने तपाडिया आणि त्याची पत्नी मनीषा या दोघांविरोधात खारघर पोलिस ठाण्यात अपसंपदा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सिडकोत वर्ग एकचा अधिकारी असलेल्या सागर तपाडिया २०१९ मध्ये पनवेल येथील सिडको नोडल कार्यालयात सहाय्यक वसाहत अधिकारी पदावर कार्यरत होता. त्या वेळी त्याला लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर २०२१ मध्ये सागर तपाडिया हा सहाय्यक कार्मिक अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर २०२३ मध्ये त्याने सिडकोच्या सेवेत २९ बोगस कर्मचारी कार्यरत असल्याचे दाखवून त्यांच्या नावे सुमारे तीन कोटी रुपयांची रक्कम परस्पर हडप केली होती. याप्रकरणी सागर तपाडियाविरोधात सिडकोने गुन्हा दाखल करून त्याला बडतर्फ केले आहे.
सागर तपाडियाच्या मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश एसीबीला मिळाले. यात तपाडियाकडे तीन कोटी सहा लाख ६५ हजार रुपयांची मालमत्ता असल्याचे आढळले. यावरून त्याने त्याच्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा एक कोटी ९४ लाख ४७ हजार ९०५ रुपये इतकी अधिकची अपसंपदा मिळवल्याचे निष्पन्न झाले. कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत ही मालमत्ता १७३.३६ टक्के अधिक असल्याचे चौकशीत आढळले आहे. तपाडियाने ही अवैध मालमत्ता स्वतःच्या आणि पत्नी मनीषा तपाडियाच्या नावे खरेदी केली आहे. नवी मुंबई एसीबीचे पोलिस उपअधीक्षक धर्मराज सोनके व त्यांच्या पथकाने तपाडिया पती-पत्नीविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT