बेकायदा बांधकामांची माहिती गुप्त राहत नाही
नगरसेवकांचा अधिकाऱ्यांवर आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः निवडणूक काळात आणि निवडणुकीच्या आधी अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी केल्या जातात; मात्र निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याचे कारण अधिकाऱ्यांकडून दिले जाते. निवडणुकीनंतर बेकायदा बांधकामे मोठ्या प्रमाणात झालेली दिसतात. बेकायदा बांधकामाला अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन मिळत असून अधिकाऱ्यांमुळे बेकायदा बांधकामावर कारवाई होणार असल्याची माहिती उघड होते, ती माहिती अधिकारीच बाहेर फोडतात, असा आरोप नगरसेवकांनी केला आहे.
गणपत पाटीलनगर, मालवणी, फ्री-वे परिसर, वरळी नाका आणि दहिसर गाव या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे वाढल्याचा मुद्दा शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी स्थायी समितीत उपस्थित केला होता. अवैध बांधकामांविरोधात तक्रार करूनही अधिकारी दुर्लक्ष करतात. बेकायदा बांधकामाची तक्रार करतो, त्या तक्रारदारांची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचवली जाते, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. भाजपचे नगरसेवक सभागृह नेते गणेश खनकर यांनीही या प्रकरणावर भीती व्यक्त करीत अशा प्रकारांमुळे भविष्यात मोठी घटना घडू शकते. २० वर्षांपूर्वीची आणि सध्याची मुंबईची सॅटेलाइट चित्रे सार्वजनिक करावीत, जेणेकरून अवैध बांधकामांचा खरा आकडा समोर येईल, असेही ते म्हणाले. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी स्वतःचा अनुभव सांगताना नमूद केले, की त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर दुसऱ्याच दिवशी संबंधित व्यक्ती त्यांच्या घरासमोर येऊन उभी राहिली. यावरून तक्रारदारांची माहिती गुप्त राहत नसल्याचे स्पष्ट होते, असे शिंदे यांनी सांगितले. पोईसर नदीलगतच्या परिसरात भिंत बांधण्याची परवानगी नाकारण्यात आली, असा मुद्दा भाजप नगरसेवक शिवकुमार झा यांनी उपस्थित करीत आता त्याच ठिकाणी पाच झोपड्या उभ्या राहिल्या. यामुळे नियमांचे उल्लंघन होत असून नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.