मुंबई

कुर्ला बस अपघात प्रकरण :

CD

कुर्ला बस अपघात प्रकरण

इलेक्ट्रिक बस चालवण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण नव्हते

जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण

सकाळ वृत्तसेवा,
मुंबई, ता. २ : गेल्या वर्षी कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी बसचालक संजय दत्ता मोरेला प्रथमदर्शनी रस्त्यावर इलेक्ट्रिक बस चालवण्याचे कोणतेही प्रत्यक्ष (व्यावहारिक) प्रशिक्षण दिले नव्हते, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना नोंदवले.

न्या. आर. एम. जोशी यांच्या एकलपीठाने ३० मार्चला संजय दत्ता मोरेला जामीन मंजूर केला होता. या जामीन आदेशाची सविस्तर प्रत गुरुवारी (ता. २) उपलब्ध झाली. आरोपपत्रानुसार, अर्जदाराकडे बस चालवण्याचा पुरेसा अनुभव होता; मात्र इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नव्हता, असे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. करारानुसार, बेस्ट उपक्रमाने मोरे आणि इतर चालकांना किमान सात दिवसांचे प्रशिक्षण देणे आवश्यक होते. उपलब्ध पुराव्यांनुसार, ‘बेस्ट’ प्रशासनाच्या ज्ञात असलेल्या काही कारणांमुळे, प्रशिक्षणाचा कालावधी कमी करून तीन दिवसांवर करण्यात आला होता आणि धक्कादायक बाब म्हणजे, चालकांना कोणतेही प्रत्यक्ष (व्यावहारिक) प्रशिक्षण दिले नव्हते. मुंबईसारख्या शहरात प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बस चालवण्याची जबाबदारी सोपवण्यापूर्वी रस्त्यांवर बस चालवण्यापूर्वी चालकांना पुरेसे प्रशिक्षण न देण्यामागे कोणतेही समर्थन करू शकत नाही. त्यामुळे या घटनेसाठी बेस्ट प्रशासन आणि संबंधित अधिकारीही तितकेच कारणीभूत असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
------
कृत्य सदोष मनुष्यवधाच्या श्रेणीत नाही
या घटनेत नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आणि इतर अनेक जण जखमी झाले; मात्र जामीन मंजूर करण्याच्या दृष्टीने या कथित कृत्याचा विचार कसा केला जावा, हाच मुख्य प्रश्न न्यायालयासमोर असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. मुळात हे कृत्य भारतीय न्याय संहितेच्या सदोष मनुष्यवधाच्या श्रेणीत नाही, परंतु येथे मृतांची संख्या जास्त असल्याच्या एकमेव कारणास्तव, जामीन फेटाळला जाऊ शकतो. याप्रकरणी ९६ साक्षीदारांपैकी एकाही साक्षीदाराची तपासणी अद्यापपर्यंत केलेली नाही. त्यामुळे हा खटला वाजवी कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे अधोरेखित करून न्यायालयाने जामीन मंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT