मुंबई

सानपाड्यातील उद्यानांच्या कामांची पाहणी

CD

सानपाड्यातील उद्यानांच्या कामांची पाहणी
तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश
माजी नगरसेवक नीलेश म्हात्रे यांचा दौरा
तुर्भे, ता. ६ (बातमीदार) : बेलापूर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेत आमदार मंदा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सानपाडा सेक्टर-९ येथील कै. सीताराम मास्तर उद्यानातील प्रलंबित कामांची पाहणी करण्यात आली. रविवारी (ता. ५) माजी नगरसेवक नीलेश म्हात्रे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह उद्यान व परिसरातील नागरी सुविधांचा सखोल आढावा घेतला.
या वेळी नवी मुंबई महापालिकेचे उपअभियंता विश्वनाथ लोकरे उपस्थित होते. उद्यानातील स्वच्छता, देखभाल आणि विविध सुविधा अपुऱ्या असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश म्हात्रे यांनी दिले.
दौऱ्यादरम्यान नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या सूचना जाणून घेतल्या. उद्यान अधिक आकर्षक व सर्वसमावेशक करण्याचे आश्वासन देण्यात आले. याच वेळी नागरिकांना मोफत डाबर च्यवनप्राशचे वाटप करून आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली. दौऱ्याला स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मांडलेले मुद्दे
▪ सुशोभीकरणाची कामे अपूर्ण
▪ बसण्याची व्यवस्था अपुरी
▪ सुरक्षा रक्षकांची गरज
▪ बालकांसाठी खेळणी कमी व दर्जा सुधारण्याची आवश्यकता
▪ पिण्याच्या पाण्याची सुविधा अपुरी
▪ ओपन जिम उभारण्याची मागणी
▪ प्रकाशयोजना सुधारण्याचे निर्देश
▪ हायटेन्शन लाइनखालील जागेचा विकास
▪ कबुतरखाना बंद करण्याबाबत सूचना
▪ संत शिरोमणी उद्यानात पाणपोईची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी राष्ट्रीय संयोजक! कॉकरोच जनता पार्टीवर दावा करत निवडणूक आयोगाकडे वकिलाचा अर्ज; CJPचा लोगोही वापरला

IPL 2026: हार्दिक पांड्या CSK कडून खेळणार? '०७:०७' पोस्ट अन् Mumbai Indians चा कॅप्टनची चर्चा... नेमकी भानगड काय?

माझ्या नवऱ्यानेदेखील त्या बातम्या वाचल्या... मित्रांसोबत अफेअरच्या चर्चांवर पूजा सावंतने सोडलं मौन; म्हणाली-

Ranveer singh controversy: 45 कोटींचं नुकसान? Don 3 मधून अचानक बाहेर पडला रणवीर? काय घडलं?

Latest Marathi News Live Update : बाजारात इलेक्ट्रिक दुचाकीं खरेदीकडे नागरिकांचा कल

SCROLL FOR NEXT