मुंबई

मालवणीत चित्रीकरण साहित्याच्या गोदामाला आग

CD

मालवणीत चित्रीकरण साहित्याच्या गोदामाला आग
लाखो रुपयांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली
मालाड, ता. ६ (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील मालवणी म्हाडा परिसरात चित्रीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. ही घटना रविवारी (ता. ५) दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास घडली.
अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.
आग भीषण स्वरूपाची असली तरी वेळेत नियंत्रण मिळाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात आग पसरण्यापासून रोखण्यात यश आले आणि मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. मात्र, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याने मोठी आर्थिक हानी झाली आहे. दरम्यान, पोलिस व अग्निशमन दलाकडून आगीच्या कारणाचा पुढील तपास सुरू आहे.

रहिवासी भागात व्यावसायिक गाळ्यांवर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर रहिवासी वस्त्यांमध्ये अशा प्रकारचे व्यावसायिक गाळे व कारभार सुरू असल्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यावर कठोर नियम व अंमलबजावणीची गरज व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT