विनापरवाना सिमेंट प्रकल्प रडारवर
बोईसरमध्ये तीन ठिकाणी महसूलची कारवाई
बोईसर, ता. ८ (वार्ताहर) : परिसरातील गुंदले येथील तीन रेडिमिक्स काँक्रीट प्रकल्पांना आवश्यक परवान्यांचा अभावामुळे सील करण्यात आले आहे. बोईसर महसूल प्रशासनाने मंगळवारी ही कारवाई केली.
समृद्धी रेडिमिक्स, हितेश रेडिमिक्स तसेच स्टर्लिंग इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन एलएलबी प्रकल्पांकडे विक्रेता परवाना, ‘कन्सेंट टू ऑपरेट’ तसेच ग्रामसभेचा नाहरकत दाखला नसल्याचे तपासात स्पष्ट झाले. नियमांचे उल्लंघन केल्याने संबंधित प्रकल्पांवर ही कारवाई केली. बोईसरचे मंडळ अधिकारी विजय गुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. तसेच पुढील काळात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.