मुंबई

कडक उन्हामुळे महालक्ष्मी यात्रेत दुपारी शुकशुकाट

CD

महालक्ष्मी यात्रेकडे भाविकांची पाठ
कडक उन्हामुळे शुकशुकाट, विक्रेते चिंतित

कासा, ता. ८ (बातमीदार) ः विव्हलवेढे येथील महालक्ष्मी मातेची चैत्र पौर्णिमेपासून सुरू झालेली यात्रा सध्या उत्साहात सुरू आहे; मात्र उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारच्या वेळी भाविक नसल्याने शुकशुकाट दिसत आहे.
काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. रणरणत्या उन्हामुळे भाविक, पर्यटक दुपारच्या सुमारास यात्रेला जाणे टाळत आहेत. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने त्याचा परिणाम यात्रेवर झाला आहे. त्यामुळे दिवसभर यात्रेच्या परिसरात शांतता दिसून येत असली, तरी संध्याकाळी वातावरण बदलत आहे. पुढील दोन दिवसांत परीक्षा संपल्यानंतर तसेच शनिवार-रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
--------------------------------------
उष्माघाताची भीती
मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या यात्रेवर अनेक दुकानदार, शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मोठ्या भाड्याने दुकाने उभारून व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरू केला असला, तरी उष्माघाताच्या भीतीने भाविक दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळत आहेत. तर मुक्कामाला असलेले पर्यटक झाडांच्या सावलीत विसावा घेतात. याशिवाय पाणीटंचाईची समस्या जाणवत असल्याने भाविक त्रस्त आहेत.
-----------------------------
सहा दिवसांपासून यात्रा सुरू आहे; मात्र अपेक्षित गर्दी होत नाही. कडक उन्हाळा, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, तसेच इंधन दरवाढीचा परिणाम झाला आहे.
- रमेश राजपूत, विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar Devendra Fadnavis Meeting : सुनेत्रा पवार, पार्थ पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; बारामती पोटनिवडणुकीत भाजपची यंत्रणा सक्रीय

Video Viral: स्मृती मानधनाचे वडील अन् पलाश मुच्छलची बहीण खरंच एकमेकांना भेटले? पुन्हा लग्नाच्या चर्चांना उधाण, नेमकं सत्य काय?

US Iran Ceasefire: युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी पाकिस्तानची धडपड पण चीनचा वेगळाच दावा! ट्रम्प यांनाही मान्य...

Latest Marathi News Live Update: MPSC चा निकाल जाहीर, सोलापूरचा विजय राज्यात पहिला

ना हेअर ट्रान्सप्लांट ना आजार ! 'या' कारणासाठी प्रसाद ओकने केलंय टक्कल; नव्या लुकबद्दल म्हणाला...

SCROLL FOR NEXT