मुंबई

बेलापूर किल्ला धोक्यात

CD

बेलापूर किल्ला धोक्यात
निकृष्ट बांधकामामुळे वारसा संकटात; १ मेपासून उपोषणाचा इशारा
बेलापूर, ता. १० (बातमीदार) : नवी मुंबईतील ऐतिहासिक बेलापूर किल्ला सध्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे गंभीर धोक्यात आला असून, वारसा जतनाबाबत मोठी निष्काळजी समोर आला आहे. किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम सिडकोमार्फत एका ठेकेदाराला देण्यात आले होते. मात्र, आवश्यक तांत्रिक पात्रता नसतानाही हे काम स्वीकारल्याने आणि निकृष्ट साहित्य वापरल्याने किल्ल्याचा एक महत्त्वाचा भाग कोसळल्याची धक्कादायक बाब कॉन्शियस सिटीझन फोरमने उघड केली आहे.
पाम बीच रोडलगत असलेल्या या किल्ल्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. किल्ल्याच्या भिंतीतील मूळ दगडी बांधकाम हळूहळू नष्ट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिसरात वाढलेली झाडी आणि अपुरी देखभाल यामुळे हा ऐतिहासिक वारसा अधिक वेगाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
दरम्यान, सिडको प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्याने संताप व्यक्त होत आहे. नवी मुंबईच्या विकासातून मोठा महसूल मिळवणाऱ्या सिडकोकडूनच ऐतिहासिक वास्तूकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.
या पार्श्वभूमीवर बेलापूर किल्ल्याच्या संरक्षणासाठी कॉन्शियस सिटीझन फोरमने १ मे २०२६ पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यापूर्वी शासन व संबंधित विभागांकडे निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

चौकट
वारसा धोक्यात गंभीर
बेलापूर किल्ल्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली झालेल्या निकृष्ट कामामुळे केवळ संरचनात्मक हानीच झाली नाही, तर किल्ल्याच्या मूळ ऐतिहासिक वैशिष्ट्यांनाही धोका निर्माण झाला आहे. जुन्या दगडी बांधकामाची जागा निकृष्ट साहित्याने घेतल्याने किल्ल्याची मजबुती कमी झाली असून, भविष्यात अधिक भाग कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा ऐतिहासिक वास्तूंच्या दुरुस्तीसाठी पारंपरिक तंत्रज्ञान आणि विशेष कौशल्य आवश्यक असते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हा वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तातडीने योग्य उपाययोजना न केल्यास नवी मुंबईच्या इतिहासाचा महत्त्वाचा ठेवा कायमचा नष्ट होण्याची शक्यता आहे.

कोट
किल्ल्याच्या दुरुस्तीतील संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर आपराधिक गुन्हे दाखल करावेत. तसेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली किल्ल्याचे वैज्ञानिक पद्धतीने संरक्षण व पुनर्बांधणी करण्यात यावी.
– के. कुमार, अध्यक्ष, कॉन्शियस सिटीझन फोरम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT