मुंबई

सरकारच्या समितीकडून तीन वर्षात एकही पुस्तक नाही

CD

तीन वर्षांत एकही पुस्तक नाही!
महात्मा फुले यांच्या साहित्याबद्दल सरकारी अनास्था

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षाला ११ एप्रिलला सुरुवात होत आहे. राज्यात महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समितीकडून मागील तीन वर्षांत एकही नवीन ग्रंथ अथवा पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले नाही. यामुळे सरकारच्या समितीची ग्रंथसंपदेसंदर्भातील अनास्था समोर आली आहे.
मागील तीन वर्षांहून अधिक काळात समितीकडून केवळ सावित्रीबाई फुले समग्र हे एप्रिल २०२५ मध्ये पुनर्मुद्रित पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर एकही ग्रंथ, पुस्तके प्रकाशित होऊ शकले नाही. यामुळे राज्यात सरकारकडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या महात्मा फुले यांच्यावरील ग्रंथसंपदेची मोठी वानवा निर्माण झाली आहे.

समितीचे माजी सदस्य सचिव प्रा. हरी नरके यांचे ऑगस्ट २०२३ मध्ये निधन झाल्यानंतर समितीत अनेक बदल झाले. तरी समितीकडून ठोस प्रकारे ग्रंथसंपदा, उपलब्ध साहित्याचे प्रकाशन, मुद्रण होऊ शकले नाही. त्यातच २०२३ पासून समितीकडे महात्मा फुले समग्र, महात्मा गौरव ग्रंथ, महात्मा फुले साहित्यावरील खंड ३, ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथावरील हिंदीतील अनुवादित ‘किसान का कोडा’ आदी अनेक पुनर्मुद्रित साहित्य छपाई आणि प्रसिद्धीसाठी तयार होऊ शकतात; मात्र समितीच्या दिरंगाईमुळे तीन वर्षांपासून समितीकडे ते रखडून पडले आहेत. यासाठी समितीकडून आणि उच्च शिक्षण विभागातील सहसंचालकस्तरावरून मान्यता देण्यासाठी अक्षम्य दिरंगाई केल्याचेही संशोधकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने नवीन समितीची पहिली बैठक आपण घेतली. या समितीचे कार्य अधिक वेगाने पुढे घेऊन जाण्यासाठी मंत्री स्वत: लक्ष देत असून त्यांच्यासोबतही समितीची लवकरच बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन समिती सक्रिय
उच्च शिक्षण विभागाने १७ मार्चला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १५ जणांची समिती गठित केली आहे. यात सदस्य सचिव म्हणून डॉ. गणेश राऊत यांची निवड करण्यात आली आहेत. समितीत अनेक जणांना महात्मा फुले साहित्यावरील संशोधन आदी लेखन, प्रकाशनाचा गंधही नसल्याने त्यावर ओबीसी संघटनांकडून आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

सूची तयार करण्याला प्राधान्य
महात्मा फुले यांच्या साहित्यावर सूची तयार करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. तसेच त्यांचे इतर उपलब्ध साहित्य पुनर्मुद्रित करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे समितीचे सदस्य सचिव डॉ. राऊत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT