मुंबई

वसई-विरारच्या विकासांत वास्तुविशारद, अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची

CD

वसई-विरारच्या विकासांत वास्तुविशारद, अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची
महापौर अजीव पाटील यांचे प्रतिपादन

विरार, ता. १४ (बातमीदार) : वसई़-विरार महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर अजीव पाटील व महापालिकेत नोंदणीकृत असलेल्या सर्व अभियंते व आर्किटेक्ट्स असोसिएशनची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत शहरातील विविध मंजूर रस्ते, विकासकामे, पायाभूत सुविधा आणि नागरी विकास आराखड्यांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत महापौर आणि आर्किटेक्ट, अभियंते यांनी वसई-विरारच्या नियोजित व शास्वत विकासासाठी तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा करत एक नवा संकल्प केला आहे.

वसई-विरारचा सूनियोजित विकास करताना वास्तुविशारद (आर्किटेक्स) आणि अभियंते यांची पारदर्शी भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सोबत महापालिका प्रशासनाअंतर्गत त्यांचा नगररचना विभाग आणि अर्थात वास्तुविशारद-अभियंते यांच्यातील समन्वय वाढल्यास शहराच्या उत्तम विकासांसोबत सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्नही लवकर आणि कायदेशीररित्या पूर्ण होण्यास मदतच होईल, असे प्रतिपादन महापौर अजीव पाटील यांनी केले. त्या वेळी महापौर पाटील बोलत होते. या बैठकीत प्रामुख्याने शहर विकासाला गती देणाऱ्या आणि नागरिकांच्या सोयीसाठी असलेल्या विविध तांत्रिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

या बैठकीस महापौर अजीव पाटील यांच्या समवेत उपमहापौर मार्शल लोपीस, सभागृह नेते प्रफुल्ल साने, तर महापलिका प्रशासनाच्या वतीने नगररचना विभागाचे उपसंचालक मनीष भीष्णूरकर, सहायक नगररचनाकार श्वेता माने, आदी अभियंते, अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, शहरातील ज्येष्ठ असलेल्या बहुतांशी वास्तुविशारद, विविध अभियंते यांनी आपल्या समस्या महापौर व नगररचना उपसंचालक यांच्या समोर मांडल्या. त्यावर महापौर पाटील यांनी उपसंचालक मनीष भीष्णूरकर व त्यांच्या संबंधित नगररचना विभागास शहरातील आर्किटेक्स, अभियंते यांनी मांडलेल्या महत्त्वाच्या सूचना, काही प्रस्ताव याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे निर्देश दिले.

==================================
महापौर अजीव पाटील यांनी सर्व आर्किटेक्स, अभियंते यांना बोलावून नगररचना विभाग उपसंचालक यांच्याशी एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक घेतली. त्यामध्ये आम्हाला दैनंदिन काम करताना येणाऱ्या अडीअडचणी, काही तांत्रिक बाबी, समस्या किंवा कुठले प्रस्ताव चुकीचे किंवा त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे, हे जाणून घेतले. त्यानुसार आम्हाला बोलण्याची संधी दिली. आता महापौरांनी हे सर्व लेखी स्वरूपात निवेदन देण्यासाठी सांगितले आहे, त्यावर महापालिका नक्कीच सुधारणा आणि सकारात्मक उपाययोजना करेल, अशी आशा आहे.
- संजय नारंग, अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT