फसवणूकप्रकरणी सहा जणांना पोलिस कोठडी
खालापूर, ता. १४ (बातमीदार) ः रक्कम दुप्पट करण्याचे आकर्षक आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडप करणाऱ्या सावी कन्सल्टन्सी आणि स्वामीश कन्सल्टन्सीच्या सहा जणांना खालापूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये एका राजकीय पदाधिकाऱ्यासह एका मालिकेतील कलाकाराचाही समावेश असून, पनवेल न्यायालयाने त्यांना २२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपींनी खालापूर येथे कार्यालय उघडून आकर्षक व्याज व परताव्याचे आमिष दाखवले होते. सुरुवातीच्या काळात काही गुंतवणूकदारांना परतावा मिळाल्याने शेकडो नागरिक या प्रलोभनाला बळी पडले. मात्र, जून २०२५ पासून हा परतावा मिळणे अचानक बंद झाले. याप्रकरणी पनवेल येथील संकेत कोंडीलकर यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानुसार सह जणाना अटक करुन पनवेल न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना २२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सावी कन्सल्टन्सी एंटरप्राइजेस व स्वामीश कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडच्या आमिषाला बळी पडलेल्या नागरिकांनी कागदपत्रासह खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी यावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.