मुंबई

उरण नगरपरिषदेची आज विशेष सभा

CD

उरण, ता. १४ (बातमीदार) : नगर परिषदेमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजप गटनेते आणि नगरसेवकांनी मागणी केलेल्या विशेष सभेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नगराध्यक्षांनी विहित मुदतीत सभा न बोलावल्याने रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी ही सभा बुधवारी (ता. १५) बोलावली आहे. या सभेच्या अध्यक्षपदी उरण तहसीलदारांची नियुक्ती केली आहे.

उरण नगर परिषदेचे गटनेते जयविंद्र कोळी आणि इतर ११ नगरसेवकांनी ११ मार्चला महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमातील कलम ८१(२) नुसार एका विशेष सभेचे आयोजन करण्याची मागणी नगराध्यक्षांकडे केली होती. नियमानुसार या विनंतीनंतर १५ दिवसांच्या आत सभा बोलावणे आवश्यक होते, मात्र नगराध्यक्षांकडून या सभेचे आयोजन न झाल्याने नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. नगरसेवकांच्या तक्रारीची आणि मुख्याधिकाऱ्यांच्या पत्राची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त अधिकारांचा वापर करून ही विशेष सभा बोलावली आहे. ही सभा बुधवारी सकाळी ११ वाजता उरण नगर परिषद कार्यालयात होणार आहे. या सभेमध्ये होणाऱ्या कामकाजाचा पूर्ण अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याचे निर्देशही प्राधिकृत अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नगर परिषदेची ही विशेष सभा कोणत्या विषयावर होणार आणि त्यात काय निर्णय घेतले जाणार, याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.

यापूर्वीची सभा बेकायदा असल्याचा दावा
उरण नगर परिषदेची सभा २७ मार्चला बोलावली होती. त्यास भाजपचे १२ सदस्य उपस्थित नव्हते. त्यामुळे कोरमअभावी ती सभा तहकूब करावी लागली होती. त्यानंतर नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी तहकूब झालेली सभा अर्ध्या तासानंतर घेतली आणि त्यामध्ये २४ विविध प्रकारचे ठराव मंजूर करण्यात आले. मात्र अर्ध्या तासानंतर घेतलेली ही सभा बेकायदा असल्याचा दावा भाजपने केला होता आणि याबाबत भाजपचे गटनेते जयविंद्र कोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT