चांगल्या पावसाचे ‘बहावा’मुळे संकेत
विक्रमगड परिसरातील शेतकऱ्यांचा अंदाज
विक्रमगड, ता. २६ (बातमीदार)ः ग्रामीण भागातील शेतकरी पर्जन्यमानाचा अंदाज लावण्यासाठी निसर्गातील पारंपरिक संकेतांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. या संकेतांमध्ये झाडे, पक्षी, वाऱ्याची दिशा, वातावरणातील बदलांबरोब पिवळ्या फुलांनी बहरणाऱ्या बहावाचा समावेश आहे.
दरवर्षी बहाव्याच्या फुलोऱ्यावरून पावसाचे प्रमाण कसे राहील याचा अंदाज शेतकरी बांधतात. बहावा मोठ्या प्रमाणात, वेळेवर बहरला, तर त्या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहते, अशी पारंपरिक धारणा आहे. बहावा योग्य कालावधीत बहरल्याने, जूनमध्ये नैऋत्य मोसमी पावसाची सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त केला जातो. विक्रमगड तालुक्यातील बहुतांश शेतकरी भात, नागलीसारखी हंगामी पिके घेतात. या पिकांसाठी पुरेसा पाऊस आवश्यक असल्याने बहावा बहरल्यामुळे पर्जन्यमान समाधानकारक राहील, अशी आशा असल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत.
--------------------------------
खरीप हंगामासाठी सज्ज
बहावा सुरुवातीला भरघोस फुलांनी बहरला तर पावसाची सुरुवात चांगली होते. नंतर पर्जन्यमान मध्यम स्वरूपाचे राहते. हा वृक्ष केवळ पर्जन्याचा संकेत देणारा नाही, तर औषधी गुणधर्मांनीही समृद्ध आहे. उन्हाळ्यात पिवळ्या फुलांनी डोळ्यांना गारवा मिळतो. यामुळे पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्व असलेला बहावा बहरल्याने शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज झाले आहेत.
--------------------
पावसाचा अंदाज बांधण्यासाठी पूर्वजांनी काही नैसर्गिक संकेत सांगून ठेवले आहेत. त्यानुसार शेतीची तयारी करतो. बहावा वृक्ष हा त्यापैकी एक महत्त्वाचा संकेत आहे.
- तुकाराम सांबरे, शेतकरी, विक्रमगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.