मुंबई

विमानांच्या रिल्ससाठी जीवघेणा प्रवास

CD

पनवेल, ता. २६ (वार्ताहर) : नवी मुंबई विमानतळावरून देशांतर्गत उड्डाणाला सुरुवात करण्यात आल्याने विमानांचे लँडिंग आणि टेक-ऑफ पाहण्यासाठी सध्या नागरिकांची गर्दी उसळू लागली आहे. त्यातच विमानांच्या उड्डाणाचे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आणि समाजमाध्यमांवर रील्स बनवण्यासाठी नागरिक पनवेल टी-जंक्शन व राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. या आकर्षणापोटी आतापर्यंत तीन भीषण अपघात झाले असून, ही बाब पोलिस प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे.

विमानतळाच्या धावपट्टीवरून विमाने आकाशात झेपावताना किंवा जमिनीवर उतरताना स्पष्टपणे दिसतात. हे पाहण्यासाठी शेकडो नागरिक महामार्गाच्या कडेला आपली वाहने उभी करत आहेत. वेगाने येणाऱ्या वाहनांच्या प्रवाहात अशा प्रकारे अचानक थांबल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रील्सच्या नादात स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या पर्यटकांमुळे पोलिसांचा ताण वाढला आहे.

वाढत्या अपघातांची दखल घेत वाहतूक पोलिसांनी या भागात गस्त वाढवली असून, महामार्गावर वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच या ठिकाणी नागरिकांची गर्दी रोखण्यासाठी आणि विमानांचे दृश्य महामार्गावरून दिसू नये, यासाठी व्ह्यू कटर बसवण्यात यावेत, अशी मागणी पनवेल वाहतूक विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पत्राद्वारे केली आहे. यामुळे चालकांचे लक्ष विचलित होणार नाही आणि भविष्यातील अपघात टाळता येतील, अशी अपेक्षा आहे.

विमान पाहण्याच्या उत्साहात नागरिक आपला जीव धोक्यात घालत आहेत. आतापर्यंत तीन गंभीर अपघात झाले असून, आम्ही वारंवार पेट्रोलिंग करत नागरिकांना हटवत आहोत. नागरिकांनी या परिसरात विनाकारण गर्दी करू नये आणि रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करावे.
- औदुंबर पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पनवेल वाहतूक शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT