मुंबई

आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिस्त ही काळाची गरज— जिल्हाधिकारी

CD

आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिस्त ही काळाची गरज ः जिल्हाधिकारी
शिक्षकांसाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम उत्साहात
अलिबाग, ता. २८ (वार्ताहर) ः आजच्या डिजिटल युगात आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिस्त ही काळाची गरज बनली असून, प्रत्येक नागरिकाने उत्पन्नाचे योग्य नियोजन, खर्चावर नियंत्रण, गुंतवणुकीचे भान आणि कर्जाचे जबाबदारीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई आणि जिल्ह्याची अग्रणी बँक, ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. २४) प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषद रायगडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले, उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, रिझर्व्ह बँकेच्या उपमहाप्रबंधक डॉ. ज्योती सक्सेना, बँक ऑफ इंडिया रायगड विभाग प्रमुख दीपनविता सहानी, उपविभागीय प्रमुख भारत सहाय, जिल्हा अग्रणी प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी, तसेच रिझर्व्ह बँकेचे रायगड जिल्हा अधिकारी विशाल गोंडखे, बेंजामिन डिकोस्टा, विविध शाळांतील शिक्षक, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि बँकिंग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना रिझर्व्ह बँकेच्या उपमहाप्रबंधक डॉ. ज्योती सक्सेना यांनी सांगितले की, या प्रशिक्षणाद्वारे शिक्षकांना बँकिंग व्यवहारांचे ज्ञान, डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी तसेच रिझर्व्ह बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन आर्थिक साक्षरतेत सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिझर्व्ह बँकेचे अधिकारी विशाल गोंडखे यांनी केले, तर जिल्हा अग्रणी प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले व उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून उर्वरित शिक्षकांसाठी जिल्हाभर अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजन संपूर्ण जिल्हा आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी या वेळी दिल्या.

सायबर सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे
आर्थिक शिस्त ही केवळ बचतीपुरती मर्यादित नसून उत्पन्नाचे नियोजन, खर्चावर नियंत्रण, योग्य गुंतवणूक आणि कर्ज व्यवस्थापन या सर्व बाबींचा त्यामध्ये समावेश होतो. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून आर्थिक साक्षरतेची जाणीव निर्माण करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून, बचतीचे महत्त्व, बँकिंग व्यवहार आणि विविध शासकीय योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिल्यास भविष्यात जबाबदार नागरिक घडण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच डिजिटल व्यवहार करताना सायबर सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT