मुंबई

प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध

CD

प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन

पालघर, ता. ८ (बातमीदार) : बोईसरच्या पूर्वेस मान-वारांगडे परिसरातील एका उद्योगसमूहाच्या कारखान्यांमुळे वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असून प्रकल्पाच्या नियमितीकरण व विस्तारीकरणाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शुक्रवारी (ता. ८) ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करत विस्तारित प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कारखान्यांमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे परिसरातील पाणी, हवा आणि जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. निसर्गरम्य असलेला मान परिसर प्रदूषणामुळे ओसाड होत चालल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. प्रकल्पाच्या विस्तारामुळे सूर्या नदी प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला असून या नदीवर अवलंबून असलेल्या अनेक गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.

ही नदी पालघर तालुक्यातील गावांसह वसई-विरार महापालिका क्षेत्रालाही पाणीपुरवठा करते. त्यामुळे नदी दूषित झाल्यास मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच शेतीचे नुकसान, प्रदूषित हवेमुळे विविध आजारांचा धोका आणि स्थानिकांवर विस्थापनाची वेळ येण्याची शक्यता ग्रामस्थांनी मांडली.

या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटना, प्रतिष्ठित नागरिक आणि पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यांचा पाठिंबा लाभला. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून विराज कंपनीचा विस्तारित प्रकल्प तातडीने रद्द करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT