मुंबई

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरालगत स्वच्छता अभियान राबवा

CD

नेरूळ रेल्वे स्थानक परिसरालगत स्वच्छता अभियान राबवा
नामदेव भगत यांची आयुक्तांकडे मागणी
नेरूळ, ता. ११ (बातमीदार) ः नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात विविध कारणांमुळे बकाल अवस्था निर्माण होत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबवावे, अशी मागणी पालिकेचे विरोधी पक्षनेते नामदेव भगत यांनी पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.
नेरूळ रेल्वे स्थानक परिसरालगत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे परिसर अस्वच्छ व असुरक्षित बनत आहे. येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिसरात काही असामाजिक प्रवृत्तीचे लोक जुगार खेळत बसतात, तर काही जण मद्यपान करत असतात. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मागील महिन्यात या परिसरातील एका भंगार दुकानात ड्रग्जसारखे बेकायदा पदार्थ आढळून आल्याची घटना समोर आली होती. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याचेदेखील निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे परिसरात नियमित पाहणी करून अशा असामाजिक कृत्यांवर आळा घालण्यासाठी आवश्यक ती कठोर उपाययोजना करावी, असे नामदेव भगत यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! पुनर्विकासात आता फक्त घरे नाहीत; पायाभूत सुविधांनाही प्राधान्य मिळणार

Latest Marathi News Live Update: उद्योग व वाणिज्य आणि गुंतवणूक प्रोत्साहन या विभागांची खाती अमन अरोरा यांना सोपवण्यात आली

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

Water Supply Scheme : पाणीपुरवठा योजना ताब्यात घेण्यासाठी फुरसुंगी नगरपरिषदेला महापालिकेचे पत्र

Mumbai Water Supply: मुंबईकरांनो सावधान! १५ मेपासून पाणीपुरवठ्यात कपात; बीएमसीचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT