मुंबई

खाजगी क्लासशिवाय जुळ्या बहिणींची दहावीत चमक

CD

खासगी क्लासशिवाय जुळ्या बहिणींची दहावीत चमक
शाळेतील अभ्यास, नियमित सरावाच्या जोरावर नेहा-भूमी कदम यांचे यश
जोगेश्‍वरी, ता. ११ (बातमीदार) ः दहावीच्या निकालात जोगेश्वरीतील डोसीबाई जीजीभॉय हायस्कूलच्या दोन जुळ्या बहिणींनी उल्लेखनीय यश संपादन करत विद्यार्थ्यांसमोर आणि पालकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. नेहा दिनेश कदम हिने ९६.४० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला, तर भूमी दिनेश कदम हिने ९६.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला.
विशेष म्हणजे, या दोघींनी कोणताही खासगी क्लास न लावता केवळ शाळेतील शिक्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि घरी नियमित अभ्यास यांच्या जोरावर हे यश मिळविले. शाळेत शिक्षक शिकवत असताना पूर्ण लक्ष द्यायचे आणि रोज घरी नियमित अभ्यास करायचा, हा त्यांचा यशाचा मंत्र ठरला.
दहावीच्या परीक्षेपूर्वी त्यांनी १० ते १५ सराव परीक्षा पेपर सोडवून तयारी अधिक भक्कम केली. अभ्यासात सातत्य, योग्य नियोजन आणि एकमेकींसोबत बसून केलेला अभ्यास यामुळे आत्मविश्वास वाढल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक पालक मोठ्या फी भरून मुलांना खासगी क्लासला पाठवितात. मात्र, नेहा आणि भूमी यांनी शाळेतील शिक्षणावर विश्वास ठेवत मेहनतीच्या जोरावर यश मिळवून दाखविले. त्यामुळे नवीन पिढीसमोर तसेच पालकांसमोर त्यांनी प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! पुनर्विकासात आता फक्त घरे नाहीत; पायाभूत सुविधांनाही प्राधान्य मिळणार

Latest Marathi News Live Update: उद्योग व वाणिज्य आणि गुंतवणूक प्रोत्साहन या विभागांची खाती अमन अरोरा यांना सोपवण्यात आली

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

Water Supply Scheme : पाणीपुरवठा योजना ताब्यात घेण्यासाठी फुरसुंगी नगरपरिषदेला महापालिकेचे पत्र

Mumbai Water Supply: मुंबईकरांनो सावधान! १५ मेपासून पाणीपुरवठ्यात कपात; बीएमसीचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT