मुंबई

अनोळखी बाळांसाठी मायेचा हात

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ११ ः आईच्या मायेचा स्पर्श जसा अनमोल असतो, तसंच तिचं दूधही नवजात अर्भकासाठी जीवनदायी ठरतं. स्वतःच्या बाळासोबतच अनेक अज्ञात, अशक्त आणि आईविना असलेल्या नवजातांना जगण्याची संधी देणाऱ्या असंख्य मातांनी ‘मानवी दुग्ध दान’ ही एक निःशब्द करणारी मानवसेवा उभी केली आहे. जागतिक माता दिनानिमित्त या अज्ञात मातांना सलाम करताना राज्यातील मानवी दुग्ध पेढ्यांची कामगिरी अधिक ठळकपणे समोर येत आहे. आईच्या ममतेला सीमा नसते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे या अज्ञात माता. ज्या स्वतःच्या लेकरासोबतच हजारो अनोळखी जीवांनाही जगण्याचं अमृतदान करीत आहेत.

देशात सध्या एकूण १४० मानवी दुग्धपेढ्या कार्यरत असून, त्यापैकी सुमारे १२० पेढ्या प्रभावीपणे चालत आहेत. राजस्थानमध्ये सर्वाधिक मानवी दुग्धपेढ्या असल्या तरी दूधदानाच्या चळवळीत महाराष्ट्र देशात अग्रेसर मानला जात आहे. २०२५ मध्ये या पेढीत नऊ हजार २४७ मातांनी दूधदान केले. तब्बल ८७७ लिटर दूध संकलित झाले असून एक हजार ७५९ बाळांना त्याचा लाभ झाला आहे.


सायन दुग्धपेढीत वर्षाला आठ ते नऊ हजार माता दूधदान करण्यास येतात. दुधाची गरज कधीच संपणारी नाही. जितके मिळेल तितके कमीच असते. अनेक बाळांना दिवसातून आठ ते १० वेळा दूध द्यावे लागते. काहींना दोन ते चार एमएल, तर काहींना २५ ते ३० एमएलपर्यंत दूध लागते. दान बऱ्यापैकी होत असले तरी गरज ही वाढती आहे.
- डॉ. स्वाती मणेरकर, प्रमुख, नवजात अर्भक विभाग व मानवी दुग्धपेढी, सायन रुग्णालय

पॉइंटर्स :
- देशात सध्या १४० मानवी दुग्धपेढ्या; त्यापैकी १२० प्रभावीपणे कार्यरत
- मानवी दुग्धदानात महाराष्ट्र देशात अग्रेसर


सायन रुग्णालय दुग्धपेढी आकडेवारी
२०२५ मध्ये सायन रुग्णालयात ९,२४७ मातांनी दूधदान केले.
एकूण ८७७ लिटर दूध संकलित
१,७५९ नवजात बाळांना लाभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! पुनर्विकासात आता फक्त घरे नाहीत; पायाभूत सुविधांनाही प्राधान्य मिळणार

Latest Marathi News Live Update: उद्योग व वाणिज्य आणि गुंतवणूक प्रोत्साहन या विभागांची खाती अमन अरोरा यांना सोपवण्यात आली

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

Water Supply Scheme : पाणीपुरवठा योजना ताब्यात घेण्यासाठी फुरसुंगी नगरपरिषदेला महापालिकेचे पत्र

Mumbai Water Supply: मुंबईकरांनो सावधान! १५ मेपासून पाणीपुरवठ्यात कपात; बीएमसीचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT