मुंबई

पर्यावरण वाचवण्यासाठी धरणे आंदोलन

CD

पर्यावरण वाचवण्यासाठी धरणे आंदोलन;
प्रकल्पांविरोधात पर्यावरणप्रेमींचा एल्गार

कर्जत, ता. ११ (बातमीदार) : कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित धरण व जलविद्युत प्रकल्पांमुळे पर्यावरण, शेती आणि स्थानिक जनजीवन धोक्यात आल्याचा आरोप करीत सोमवारी (ता. १८) कर्जत येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ॲड. कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लोकमान्य टिळक चौक येथे होणार आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे.

कर्जत तालुक्यात पाली-भुतिवली, कोंढाणा, पोशिर, शिलार, टाटा जलविद्युत प्रकल्पाचा दुसरा टप्पा आणि टोरेंट पॉवरचा तीन हजार मेगावॉट क्षमतेचा पंप्ड स्टोरेज प्रकल्प प्रस्तावित आहे. पर्यावरणप्रेमींच्या मते, या सर्व प्रकल्पांमुळे हजारो झाडांची तोड, वनक्षेत्राचा ऱ्हास, सुपीक शेतीचे नुकसान आणि अनेक गावांचे विस्थापन होण्याचा धोका आहे. टोरेंट प्रकल्पासाठी सुमारे ३७७ हेक्टर जमीन लागणार असून त्यापैकी २३३ हेक्टर दाट जंगल आहे. पर्यावरण अहवालानुसार ४८ हजारांहून अधिक झाडे तोडली जाऊ शकतात.

--------------
हा परिसर भीमाशंकर अभयारण्य आणि पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या पट्ट्यालगत असल्याने वन्यजीव आणि जलस्रोतांवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोशिर धरणासाठी ६,३९४ कोटी आणि शिलार धरणासाठी ४,८६९ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे बोरगाव, उंबरखांड, चई, चेवणे, शिलार आणि धोत्रे यांसह अनेक गावांतील शेकडो कुटुंबे बाधित होऊ शकतात.

-------------------
आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
कर्जत पर्यावरण बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून आयोजित या आंदोलनात शेतकरी, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक सहभागी होणार आहेत. आंदोलनस्थळी स्वाक्षरी संकलित करून शासनाला निवेदन पाठविण्यात येणार आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्याचा इशारा समितीने दिला आहे. तसेच पर्यावरण वाचवण्यासाठी नागरिकांनी आपली एक स्वाक्षरी करण्यासाठी १८ तारखेला आंदोलनस्थळी भेट द्यावी, असे आवाहन ॲड. कैलास मोरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! पुनर्विकासात आता फक्त घरे नाहीत; पायाभूत सुविधांनाही प्राधान्य मिळणार

Latest Marathi News Live Update: उद्योग व वाणिज्य आणि गुंतवणूक प्रोत्साहन या विभागांची खाती अमन अरोरा यांना सोपवण्यात आली

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

Water Supply Scheme : पाणीपुरवठा योजना ताब्यात घेण्यासाठी फुरसुंगी नगरपरिषदेला महापालिकेचे पत्र

Mumbai Water Supply: मुंबईकरांनो सावधान! १५ मेपासून पाणीपुरवठ्यात कपात; बीएमसीचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT