मुंबई

तुर्भे रेल्वे स्थानकाजवळील पदपथांची दुरवस्था

CD

तुर्भे रेल्वे स्थानकाजवळील पदपथांची दुरवस्था
प्रवाशांचा संताप
तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : तुर्भे रेल्वे स्थानक परिसरातील पदपथांची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ही समस्या गंभीर बनल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पनवेल-ठाणे लोहमार्गावरील तुर्भे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी एपीएमसी मार्केट आणि औद्योगिक वसाहतीत ये-जा करतात. मात्र, स्थानकाबाहेरील जनता मार्केटकडे जाणारे तसेच रहिवासी वस्तीलगतचे पदपथ अनेक ठिकाणी खराब झाले आहेत. पदपथावरील लाद्या उखडल्याने पादचाऱ्यांना अडथळ्यांतून मार्ग काढावा लागत असून, धारदार झालेल्या लाद्यांमुळे दुखापतींच्याही घटना घडत आहेत.
याशिवाय पदपथांवर अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना रस्त्यावरून जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे. स्थानक ते एपीएमसी मार्गावर फेरीवाले आणि अनधिकृत पार्किंगमुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. पदपथालगत उभ्या वाहनांच्या आडून काहीजण लघुशंका करत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच काही ठिकाणी बांधकाम साहित्य व अडगळ टाकण्यात आल्याने पदपथांचा वापर आणखी कठीण झाला आहे. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने दुरुस्ती व अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dal Prices: सणासुदीपूर्वी महागाईचा झटका! साखर-कांद्यानंतर आता डाळी महागल्या, जाणून घ्या नवे दर...

Sugar Stocks: साखर तुमच्यासाठी महागली, मात्र शेअर्ससाठी 'गोड' झाली! साखर कंपन्यांचे अनेक शेअर्स 52-Week High वर

Marathi News Live Updates : भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

कल्याणमध्ये डॉक्टरांवर पुन्हा हल्ला! रुग्णाच्या नातेवाईकाकडून अरेरावीची भाषा वापरत बेदम मारहाण; धक्कादायक घटना CCTVत कैद

MHADA: भाडेतत्त्वावरील घरांसाठी नवे धोरण; म्हाडाचे घर भाड्याने कसे घेता येणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT