मुंबई

कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट

CD

कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांची माहिती
मुंबई, ता. २४ : कोकणातील रत्नगिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी आदिम समाजाकडून रेखाटलेल्या कातळशिल्पांवर आधारित आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट बनविला जाणार आहे. अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी विधान परिषदेच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. तसेच यासाठी स्थळ निरीक्षण केले जाईल, तसेच स्थानिक लोकांच्या जीवनमानात त्याचे असणारे महत्त्व, त्यांच्या दंतकथा यांचे दस्तऐवजीकरण करुन कातळशिल्पांवर हा माहितीपट तयार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेचे सदस्य सुनील शिंदे यांनी रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील प्राचीन कातळशिल्पांचे संवर्धन करण्यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थ‍ित केला होता. त्यावरील लेखी उत्तरात मंत्री शेलार यांनी यासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहितीपट बनविला जाणार असल्याची माहिती दिली. मंत्री ॲड. शेलार यांनी आपल्या उत्तरात सांगितले की, ‘कोकणातील कातळांवर कोरलेल्या प्राचीन कलाकृतींना कातळशिल्प म्हटले जाते. ही कातळशिल्पे प्रामुख्याने रत्नगिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा या परिसरात मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. आजपर्यंत सुमारे १०० हून अधिक स्थळांवर १,५०० पेक्षा अधिक कातळशिल्पांची नोंद करण्यात आलेली आहे. देऊड, कशेळी, चवे, भगवतीनगर, कापडगाव, देवीहसोळ, बारसू, उक्षी येथील कातळशिल्प या राज्य संरक्षित स्मारकांवर व इतर नऊ असंरक्षित अशा एकूण १७ स्मारकांच्या स्थळांवर संरक्षणभिंती, पोहोच मार्ग, दिशादर्शक फलक, माहिती केंद्रे व स्वच्छतागृहे उभारण्याच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी ४.३२ कोटी इतका निधीही उपलब्ध करून देण्यात आले आहे.’ या कातळशिल्पांच्या स्थळांना राज्य सरेक्षित स्मारके म्हणून घोषित करण्यात आले असून, कोकणातील कातळशिल्पांचा जागतिक वारसाच्या प्राथमिक यादीत समावेश झाला असून, अंतिम प्रस्ताव दाखल करण्याआधीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात येत असून, त्याचा अहवाल लवकरच केंद्र सरकारला सादर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नवीन स्थळांचा शोध होणार
कोकणातील कातळशिल्पांचे संशोधन, संवर्धन, व्यवस्थापनाबाबत तसेच, नवीन स्थळांचा शोध घेणे या उद्देशांसह वर्ल्ड हेरिटेज डेस्क स्थापन करण्यासाठी येणाऱ्या रुपये १४.६२ कोटी इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कोकणातील कातळशिल्पांचे वेगवेगळ्या अंतरांमधून सुक्ष्म दृष्टीने, सर्व हवामानामध्ये दृकश्राव्य चित्रीकरण होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT