मुंबई

जुन्या इमारतींचा पुनर्विकास

CD

जुन्या इमारतींचा पुनर्विकास
‘एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’ (यूडीसीपीआर) नियमामुळे महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास (रीडेव्हलपमेंट) सुरू आहे किंवा होणार आहे. हा ‘यूडीसीपीआर’ नियम काय आहे? त्यामुळे ‘एफएसआय’ कसा व किती वाढला? त्याचा वापर कसा करायचा? फिसिबिलीटी रिपोर्ट कशासाठी काढतात? पी. एम. सी म्हणजे काय? आदींबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा रविवारी (ता. १) होणार आहे. यामध्ये इमारतींचा पुनर्विकास करण्याची पद्धत, त्यासाठीचे पेपर्स, विकसक कसा निवडावा, जुन्या सभासदांना होणारे फायदे, करारनामा कसा करावा, महारेरा रजिस्ट्रेशन आदी सर्व मुद्यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. सोसायटी स्वयंपुनर्विकास करू इच्छिणारे, नवीन विकसक, ज्यांना रीडेव्हलपमेंट क्षेत्रात रस आहे, असे सर्वजण, रिअल इस्टेट एजंट यांच्यासाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७
................

मेडिकल कोडिंग प्रमाणपत्र प्रशिक्षण
वैद्यकीय क्षेत्रात करिअरसाठी मेडिकल कोडिंग हे तीन महिन्यांचे प्रमाणपत्र प्रशिक्षण ‘एसआयआयएलसी’ व टेक महिंद्रा यांच्या वतीने सोमवारपासून (ता. २) सुरू होत आहे. यामध्ये सीपीसी (सर्टिफाइड प्रोफेशनल कोडर) प्रमाणपत्र तयारीचे मार्गदर्शन, तसेच केपीओ (नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग) व बीपीओसाठीचे (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) मार्गदर्शन होणार आहे. मेडिकल शब्दावलीची ओळख, मेडिकल सेवा भाषेची समज, शरीर विज्ञान आणि शारीरिक रचना, कोडिंग प्रणाली : आयसीडी-१०, सीपीटी आणि एचसीपीसीएस कोडिंग, वैद्यकीय सेवा नियमावली (एचआयपीएए), कोडिंग नियम व मार्गदर्शक तत्त्वे, कोडिंग सराव आदींचा समावेश आहे. सायन्स विषयातील २१ ते २५ वयोगटातील पदवीधारक, व्यावसायिक, मेडिकल कोडिंगमध्ये करिअर करू इच्छिणारे प्रवेशास पात्र आहेत.
संपर्क : ८४८४८११५४४
..............
व्यावसायिक मिलेट्स प्रक्रिया कार्यशाळा
आहार व आरोग्यविषयक जागरूकता वाढल्याने भरडधान्ये (मिलेट्स) आता ताटात दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर भरडधान्यांवर प्रक्रिया करून विविध नावीन्यपूर्ण पदार्थ तयार करण्याविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १४ व १५ डिसेंबर रोजी होणार आहे. कार्यशाळेत मिलेट्स म्हणजे काय, महत्त्व, उपयुक्तता, गरज व मागणी, पोषक गुणधर्म याबाबत माहिती दिली जाणार आहे. पराठा, उपमा, लापशी, खीर, पीठ, लाडू, नमकीन, पुलाव, इडली, डोसा, कुकीज, ढोकळा, स्वीट व बर्फी, प्रोटीन पावडर, चिवडा इत्यादी मिलेट्सचे विविध पदार्थ शिकवण्यात येतील. पॅकिंग, ब्रॅण्डिंग, लागणारी मशिनरी, प्रकल्प, उत्पादन व बाजार खर्च, विक्रीच्या पद्धती आदींबाबतही मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
.................
उद्योग सुरू करण्याची पूर्वतयारी कार्यशाळा
देशातील कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रात व्यावसायिक संधी वाढत आहेत. राज्य, तसेच केंद्र सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून महिला, पुरुष, तसेच शेतकरी गट व महिला बचत गटांना, उद्योजक व व्यावसायिकांना प्रोत्साहन दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर सदर संधींचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक किंवा गटाच्या स्वरूपात कशा प्रकारे तयारी करावी, व्यवसायासाठी आवश्यक परवानग्यांसाठी काय पूर्वतयारी लागते, व्यवसायातील कर व्यवस्थापन कसे करावे, व्यवसायासाठी विविध शासकीय योजना कोणत्या आणि त्यांच्यासाठीचे पात्रता निकष कोणते, आदींविषयी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यशस्वी उद्योजकांच्या प्रेरणादायी कथादेखील सादर केल्या जाणार आहेत. शेतकरी गट व महिला बचत गटांना आणि शेतकरी संस्थांच्या प्रतिनिधींना समूहामध्ये नावनोंदणी शुल्कामध्ये सवलत आहे.
संपर्क : ८९५६७१२६३१, ९३०७६४९०४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Novak Djokovic: जोकोविच आप्पाचा विषय लय हार्डए... विम्बल्डननेच शेअर केला मराठी गाण्यावर Video; एकदा पाहाच

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

SCROLL FOR NEXT