मुंबई

एसआयआयएलसी

CD

ॲमेझॉनवर विका स्वतःची उत्पादने

ॲमेझॉनवर उत्पादन विकायचे असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, नोंदणी कशी करावी, कोणती कागदपत्रे लागतात, किती दिवस लागतात हे सर्व करून बिझनेस कसा वाढवायचा, ॲमेझॉनवर विक्री करण्यास किती खर्च लागतो, सेलर पोर्टल कसे असायला हवे आदींबाबत प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करणारी कार्यशाळा शनिवारी (ता. ३१) आयोजिली आहे. कार्यशाळेत उत्पादन कसे लिस्ट करावे, डिलिव्हर करावे, रिटर्न्स असतील तर ते कसे हाताळावे, ॲमेझॉन ॲपवरती उत्पादन जास्तीत जास्त कसे दिसतील, जेणेकरून विक्री वाढेल, ऑफर कशा ठेवायच्या, उत्पादन स्पॉन्सर कसे करायचे, पेमेंट कसे पाहायचे, तत्काळ सपोर्ट कसा घ्यायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संपर्क : ९३५६९७३४२७

ई-कॉमर्समधील ड्रॉप शिपिंग बिझनेस मॉडेल
ई-कॉमर्समध्ये यशस्वी करिअर घडवायचं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी खास आयोजिलेली ड्रॉपशिपिंग बिझनेस मॉडेल ही एकदिवसीय कार्यशाळा १ जून रोजी होणार आहे. ड्रॉप शिपिंग ही अशी पद्धत आहे जिथे कोणतीही इन्व्हेंटरी किंवा गोदामाची गरज न पडता तुम्ही ऑनलाईन स्टोअर चालवू शकता. फक्त योग्य उत्पादने, विश्वासार्ह पुरवठादार आणि परिणामकारक मार्केटिंगच्या साह्याने तुम्ही स्वतःचा व्यवसाय काही तासांत सुरू करू शकता. कार्यशाळेत तुम्हाला शून्य इन्व्हेंटरीतून स्वतःचा स्टोअर तयार करून प्रत्यक्ष व्यवसाय कसा सुरू करावा हे शिकवले जाईल. यामध्ये ड्रॉप शिपिंगचे सैद्धांतिक ज्ञान, शॉपिफाय (Shopify) वेबसाइट डेव्हलपमेंटचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि समाजमाध्यमांवर मार्केटिंग जाहिराती कशा तयार करायच्या याचं मार्गदर्शन होणार आहे. संपर्क : ८४८४८११५४४

पॅकेजिंग तंत्रज्ञान उद्योग कार्यशाळा
प्रक्रिया केलेले सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ, शेतमाल असो वा दूध किंवा पाणी अशा सर्व प्रकारच्या उत्पादनांची पॅकिंग करण्यासाठी पेपर, कोरुगेटेड बॉक्स, लाकूड, प्लास्टिक इत्यादी विविध प्रकारचे पॅकेजिंग मटेरिअल लागत असून, बाजारात याची प्रचंड मागणी आहे. हे मटेरिअल कसे तयार करतात, त्यासाठी कोणती अद्ययावत यंत्रे लागतात, छोटी पॅकेजिंग इंडस्ट्री सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल इत्यादीविषयी सविस्तर माहिती करून देणारा ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम ९ जूनपासून सुरू होत आहे. यात पॅकेजिंग उद्योगातील वाढत्या संधी, विविध प्रकारच्या मटेरिअलची ओळख, लागणारी यंत्रे, छोटे पॅकेजिंग युनिट सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी इत्यादीविषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. ज्यांना पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये स्टार्ट अप करायचे आहे तसेच ज्यांचे पॅकेजिंग युनिट असून त्यांना यातील अद्ययावत तंत्रज्ञान जाणून घ्यावयाचे आहे इत्यादींसाठी ही कार्यशाळा फायदेशीर आहे. संपर्क : ८४८४८११५४४

हायड्रोपोनिक्स पद्धतीने घरी पिकवा भाजीपाला
व्यावसायिकदृष्ट्या आधुनिक हायड्रोपोनिक तंत्राने भाजीपाल्याची शेती करून दर्जेदार गुणवत्तेचे उत्पादन कसे मिळवावे, पायलट बेसिसवर हा प्रयोग कसा करावा इत्यादीविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १४ व १५ जून रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाची ओळख, आवश्यक साधने व फर्टीगेशन, पाण्याची गुणवत्ता व आवश्यक अन्नद्रव्ये, देशी-विदेशी भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती इत्यादी प्रकारचा भाजीपाला कसा पिकवावा, घरच्या घरी हायड्रोपोनिक युनिट अथवा गार्डन कसे उभारावे, हायड्रोपोनिकसाठी रोपे कशी तयार करावी, न्यूट्रियंट सोल्युशन कसे तयार करावे, सामू, प्रकाश, आर्द्रता, तापमान यांचे महत्त्व, अन्नद्रव्यांची कमतरता व उपाय आदींविषयी सविस्तर मार्गदर्शन होणार आहे. शेतकरी, प्रोफेशनल्स, संशोधक, विद्यार्थी, शेतीविषयक सल्लागार इत्यादी प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात.
संपर्क : ८४८४८११५४४

एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT