Mumbai Rickshaw esakal
मुंबई

Mumbai Journey : मुंबईकरांचा प्रवास महागणार? रिक्षा भाडेवाढीची शक्यता

मुंबई रिक्षामेन्स युनियनचे नेते थंपी कुरियन म्हणाले की, सध्या मुंबईत रिक्षाचे भाडे दीड किलोमीटरसाठी २३ रुपये आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई रिक्षामेन्स युनियनने रिक्षाचे भाडे वाढवण्याचा प्रस्ताव सरकारकडे दिला होता मात्र, आता मुदत उलटून गेल्यानंतरही सरकारने निर्णय न दिल्याने संघटनने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. दरम्यान संघटनेची प्रशासनासोबत बैठक लवकरच होणार आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबई रिक्षामेन्स युनियनचे नेते थंपी कुरियन म्हणाले की, सध्या मुंबईत रिक्षाचे भाडे दीड किलोमीटरसाठी २३ रुपये आहे. मात्र, हे भाडे २३ रुपयांवरून २५ रुपये करावे, अशी मागणी युनियनची आहे. खटुआ समितीच्या फॉर्म्युल्यानुसार ग्राहक मूल्य निर्देशांक, रिक्षा विकत घेण्याचा खर्च, रिक्षांची डागडुजी करण्याचा खर्च, विमा आणि विविध कर लक्षात घेऊन रिक्षाचे भाडे ठरवण्यात येते. कोरोनामुळे आम्हाला कमी भाडेवाढ देण्यात आली होती.

आताची महागाई पाहता त्यामध्ये वाढ करणे आवश्यक आहे.युनिअनने एमएमआरटीएकडे ही मागणी केली आहे. मात्र, त्यावर सरकारकडून कोणतीच प्रतिक्रिया न आल्याने रिक्षा चालकांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. परंतु लवकरच संघटनेला चर्चेसाठी बोलवण्यात आले आहे. त्यामध्ये भाडेवाढीसह रिक्षा स्टॅन्ड आणि रिक्षा चालकांना रस्त्यावर नसलेली स्वच्छतागृह सुविधा याबाबत चर्चा होणार आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT