मुंबई

आदिवासी बांधवांचा बुलंद आवाज हरपला : सुधीर मुनगंटीवार

विनोद राऊत

मुंबई : माजी आदिवासी विकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू सावरा यांच्या निधनाने आदिवासी बांधवांचा बुलंद आवाज हरपला अशी शोकभावना माजी अर्थमंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

विष्णू सवरा यांनी  कार्यक्षम व कार्यतत्पर लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. तळागाळातील सामान्य माणसाच्या उत्थानासाठी ते आयुष्यभर झटले . विधानसभेत आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी बुलंद होणारा त्यांचा आवाज त्यांचा सहकारी म्हणून मी जवळून अनुभवला आहे. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी आदिवासी बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. आदिवासी समाजात भाजपचे संघटन बळकट करण्यासाठी त्यांनी  कायम परिश्रम घेतले. त्यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीची तसेच एकूणच राजकिय व सामाजिक क्षेत्राची  मोठी हानी झाली असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

कोकिळाबेन रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास : 

आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचं निधन झालंय. मुंबईतल्या कोकिळाबेन रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी प्राणज्योत मालवली आहे.

tribal brothers lost their strong voice vinshu shvara passes away

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT