Panvel-Karjat Tunnel News
Panvel-Karjat Tunnel News Sakal
मुंबई

मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा बोगदा पनवेल-कर्जतदरम्यान

सकाळ वृत्तसेवा

मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा बोगदा पनवेल-कर्जतदरम्यान उभारण्यात येणार आहे. पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वेमार्गाच्या कामानिमित्त तीन बोगदे तयार केले जाणार आहेत.

मुंबई - मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा बोगदा (Long Tunnel) पनवेल-कर्जतदरम्यान (Panvel-Karjat) उभारण्यात येणार आहे. पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वेमार्गाच्या कामानिमित्त तीन बोगदे तयार केले जाणार आहेत. यापैकी वावर्ले येथील बोगदा २.६ किमी लांबीचा तयार करण्यात येणार आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी ३) अंतर्गत पनवेल ते कर्जत दुहेरी रेल्वे मार्ग हाती घेतला आहे. हा मार्ग तयार झाल्यास सीएसएमटी-कर्जत मार्गे पनवेल हा रेल्वेचा नवा पर्याय उपलब्ध होईल.

सध्याच्या ठाणे-दिवा दरम्यानच्या १.६ किमीच्या पारसिक बोगद्यानंतर पनवेल-कर्जतदरम्यानच्या वावर्ले येथील २.६ किमी लांबीचा बोगदा मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा बोगदा असेल, असे एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पनवेल-कर्जत या नव्या २९.६ किमीच्या दुहेरी रेल्वे मार्गासाठी ७५ टक्के भूसंपादन झाले, तर उर्वरित भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. या मार्गासाठी दोन हजार ७८३ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च येणार असून मार्च २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

पारसिक बोगदा १.३ किमी

मुंबई ते कल्याण रेल्वेमार्गाच्या दोन मुख्य मार्गिका पारसिक बोगद्यातून जातात. हा बोगदा १.३ किमी लांबीचा असून त्या वेळी भारतीय रेल्वेवरील एक किमीपेक्षा जास्त लांबीचा हा पहिला बोगदा होता. तेव्हा तो आशियातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा बोगदा होता. या बोगद्यामुळे मुंबई ते कल्याणमधील अंतर ९.६ किमीने कमी झाले आहे. आता या बोगद्यातून जलद लोकल ट्रेन जाणे बंद झाले आहे. बोगद्यातून मालगाड्या, एक्स्प्रेस, पार्सल गाड्या जातात.

नवा मार्ग असा

पनवेल-कर्जत दरम्यान पनवेल, चौक, मोहापे, चिखले, कर्जत अशी पाच स्थानके असतील. याशिवाय फलाट, पादचारी पूल, भुयारी मार्ग इत्यादी कामे होणार आहेत. ३.१२ किमीचे तीन रेल्वे बोगदे असणार आहेत. तसेच या रेल्वेमार्गावर दोन रेल्वे उड्डाणपूल, आठ मोठे पूल आणि ३६ लहान पूल असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT