File Photo
File Photo 
मुंबई

बावीस हजार कोटींची माया ‘ईडी’कडून जप्त

संजय मिस्कीन

मुंबई : बहुचर्चित सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) २०१२ ते २०१८ या काळात ‘पीएमएलए’ कायद्यांतर्गत एकूण ८८१ गुन्हे दाखल करण्यात आले, तर ९७३ मालमत्ता जप्त करण्याचा आदेशही निघाला. याच सहा वर्षांत एकूण २२ हजार ५९ कोटी ७० लाख रुपयाची संपत्तीही जप्त करण्यात आली. २०१२ ते २०१८ या काळात १५२ जणांना अटक करण्यात आली.

देशातील राजकारणातील दिग्गज नेत्यांना घाम फोडणारी संस्था म्हणजे ‘ईडी’. आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी करणारी, आर्थिक गुन्ह्याचा मुकाबला करणारी ही यंत्रणा आहे.

प्रशासन आणि राजकारणातील आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी ‘ईडी’ काम करते. ‘ईडी’च्या भीतीने कित्येक उद्योगपती फरारी झाले आहेत, तर कित्येक तुरुंगाची हवा खात आहेत. महसूल आणि अर्थ मंत्रालयांतर्गत काम करणारी ही संस्था आहे. परकी विनिमय व्यवस्थापन अधिनियम (फेमा) १९९९ आणि दुसरा अवैध मुद्रा रूपांतरण प्रतिबंध २००२ हे दोन कायद्यांची अंमलबजावणी ‘ईडी’ करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT