मुंबई

एटीएममुळे उलगडला तरुणीच्या खुनाचा गुन्हा

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मानखुर्दमधील रोहिणी घोरपडे हिच्या हत्येचा उलगडा झाला असून पोलिसांनी सुनील शिर्के (४४), रामचंद्र जाधव (३६) आणि विजयसिंह मोरे (२२) यांना अटक केली आहे. रोहिणीचे एटीएम कार्ड वापरून जाधव याने पैसे काढल्यामुळे गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. लग्नाचा तगादा लावल्याने तिची कट रचून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणारी रोहिणी घोरपडे (२८) मैत्रिणीच्या लग्नाला जाते, असे सांगून १४ नोव्हेंबरला घरातून निघाली. ती घरी न परतल्यामुळे तसेच तिच्याशी संपर्क होत नसल्यामुळे भाऊ राजेंद्र मोहिते यांनी दोन दिवसांनंतर मानखुर्द पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी रोहिणीच्या कामाच्या ठिकाणी चौकशी केली असता, तिचे सुनील शिर्के याच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याचे आढळले. कोणताही परिस्थितीजन्य पुरावा नसताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन बोबडे, निरीक्षक चंद्रकांत लांडगे, उपनिरीक्षक तुकाराम घाडगे, प्रताप देसाई, कृष्णांत माने आदींनी एक-एक धागा जुळवण्यास सुरुवात केली. रोहिणीचे स्टेट बॅंकेचे एटीएम कार्ड वापरून वाशी आणि कोपरखैरणेतील आयडीबीआय आणि कोटक महिंद्र बॅंकांच्या एटीएममधून १५ आणि १६ नोव्हेंबरला ६५ हजार रुपये काढण्यात आल्याचे तपासात समजले.

पोलिसांनी अधिक तपास केला असता, जाधव याने पैसे काढले असल्याचे उघड झाले. शिर्के आणि जाधव मित्र असून, त्या काळात ते एकमेकांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस तपासात जाधव त्याच्या मूळ गावी गेल्याची माहिती मिळाली. दोघांवरील संशय वाढल्याने पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली. शिर्के आणि जाधव यांनी रोहिणीला माणगावमधील शिरवाड गावी नेऊन ठार केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात त्यांना बेस्ट उपक्रमाचे बसचालक विजयसिंह मोरे याने मदत केल्याचे उघड झाले. तिघांनाही मानखुर्द पोलिसांनी अटक केली.

दोन दिवसांपूर्वी खणला खड्डा
रोहिणी घोरपडेने सुनील शिर्केकडे लग्नाचा तगादा लावला होता. त्यामुळे त्याने मित्रांच्या साथीने तिचा खून करण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने गावी जाऊन खड्डा खणला. त्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने तिला गावी नेले. निर्जन स्थळी नेऊन तिच्या डोक्‍यावर फावड्याच्या दांड्याने प्रहार केले आणि साडीने तिचा गळा आवळून तिचा खून केला. दोन दिवसांपूर्वी खणलेल्या खड्ड्यात तिचा मृतदेह गाडून ते निघून गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT