Hoarding collapse in Kalyan  
मुंबई

Hoarding collapse in Mumbai : पुन्हा कोसळले होर्डिंग! कल्याणमध्ये रस्त्यावर अनेक गाड्या दबल्या, दोन जण जखमी; Video Viral

Hoarding collapse in Kalyan mumbai : कल्याणमध्ये सहजानंद चौकात रस्त्यावर होर्डिंग कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असून गाड्यांचेही नुकसान झाले आहे.

रोहित कणसे

कल्याणमध्ये सहजानंद चौकात रस्त्यावर होर्डिंग कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असून अनेक गाड्यांचेही नुकसान झाले आहे. कल्याण पश्चिममधील सहजानंद चौकात शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ऐन रहदारीच्या या रस्त्यावर होर्डिंग कोसळल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटना घडली त्यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे देखील पाहायला मिळालं. कल्याण पश्चिममधील सहजानंद हा अत्यंत रहदारीचा रस्ता असून या रस्त्यावर भला मोठा होर्डिंग कोसळला. या रस्त्याच्या बाजूलाच अनेक दुकाने तसेच एक रुग्णालय देखील आहे. होर्डिंग कोसळलं तेव्हा त्याखाली पार्किंगमधील अनेक गाड्या अडकल्याने त्या वाहनांचे देखील नुकसान झाले. दरम्यान या दुर्घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनावर दुर्लक्ष गेल्याचा आरोप केला आहे.

घाटकोपर दुर्घटनेच्या आठवणींना उजाळा

मुंबईतील घाटकोपर येथे १३ मे रोजी झालेल्या तुफान पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे भले मोठे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली होती. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या दुर्घटनेत अनेकांना आपला जीव गमावला होता तर असंख्य जण जखमी देखील झाले होते. दरम्यान या दुर्घटनेनंतर राज्यभरात दिसून येणाऱ्या अनाधिकृत होर्डिंग्सचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी मुंबईसारख्या शहरात अनाधिकृत होर्डिंग्सवर कारवाई देखील करण्यात आली. मात्र हा मुद्दा आता मागे पडला आहे . आजच्या कल्याणमधील घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पुन्हा एकदा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT