malad accident
malad accident  sakal
मुंबई

भयानक घटना: मालाडमद्धे सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: मालाड पूर्व येथे काम सुरु असलेल्या इमारतीच्या सेप्टीक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नजीकच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मालाड पूर्व येथे रत्नागिरी हॉटेल जवळ रहेजा टॉवर या एका खासगी इमारतीचे इमारतीचे काम सुरु असताना तीन कामगार अचानक सेप्टिक टँकमध्ये पडले.

अग्निशमन दलाने तात्काळ बचाव कार्य हाती घेऊन त्यांना टाकीमधून बाहेर काढले व ट्रामा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र गंभीर जखमी झाल्याने दोन कामगारांचा मृत्य़ू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

कंत्राटदाराकडून काम सुरु होते. यावेळी येथील सेप्टिक टँकच्या साफसफाईचे काम सुरु असताना अचानक तीन कामगार पडल्याने अडकले.

अग्निशमन दलाला माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. अथक प्रयत्नानंतर तीन्ही कामगारांना टाकीमधून बाहेर काढून तात्काळ जवळच्या ट्राम केअर ह़ॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गंभीर जखमी झाल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

यापूर्वी २१ मार्च रोजी मालाड पश्चिमेला मालवणी अंबुजवाड़ी परिसरात एका सार्वजनिक शौचालयामध्ये सेप्टिक टँकमध्ये तीन कामगार पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पालिकेने संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटिस पाठवले, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. दरम्यान मालाडच्य़ा दुर्घटनेची संबंधित यंत्रणेकडून चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT