मालाड दुर्घटनेतील 
आणखी एकाचा मृत्यू

मालाड दुर्घटनेतील आणखी एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मालवणी-मालाड अंबोजवाडी येथील सार्वजनिक शौचालयाच्या टाकीत तिघे जण पडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली होती. या दुर्घटनेतील आणखी एकाचा आज मृत्यू झाला असून विकास केवट (वय २०) असे त्याचे नाव आहे. या दुर्घटनेत सूरज केवट (वय १८) याचा कालच मृत्यू झाला होता. यातील एकाची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. याप्रकरणी पालिकेने हे शौचालय चालवणाऱ्या ओम दुर्गा सेवा सोसायटी या संस्थेला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
मालाड येथील सार्वजनिक शौचालयाच्या टाकीत सूरज केवट, विकास केवट आणि रामलगन केवट (वय ४८) हे तिघे पडले होते. सूरज याचा कालच मृत्यू झाला होता, तर विकास केवट आणि रामलगन केवट यांच्यावर शताब्दी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. यातील विकास याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. हे शौचालय मे. ओम दुर्गा सेवा सोसायटी या खासगी संस्थेला सीबीओअंतर्गत चालवण्यास देण्यात आले आहे. यात संस्थेचा निष्काळजीपणा असल्याचे दिसून येत असल्याचे पालिकेच्या पी- उत्तर विभागाने पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिशीत म्हटले आहे. याबाबत पोलिस कारवाई का करू नये, याबाबतचा २४ तासांत खुलासा करावा, असे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com