Anita Birje Joins Shiv Sena Esakal
मुंबई

Eknath Shinde: माझा भाऊ मुख्यमंत्री आहे म्हणत, ठाकरेंच्या महिला उपनेत्याचा शिंदे गटात प्रवेश

Shiv Sena UBT: दोन्हीकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. अशात दोन्ही पक्षांमध्ये एकेकांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते फोडण्यासाठी चढाओढ लागली आहे.

आशुतोष मसगौंडे

शिवसेना फुटल्यानंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत दोन्ही शिवसेनेला समाधानकार यश मिळाले. त्यानंतर आता दोन्हीकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. अशात दोन्ही पक्षांमध्ये एकेकांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते फोडण्यासाठी चढाओढ लागली आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार धक्का बसला आहे. कारण ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या आणि आनंद दिघे यांच्यापासून कार्यरत असलेल्या अनिता बिर्जे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

कोण आहेत अनिता बिर्जे

उद्धव ठाकरे यांच्या शिवसनेनेच्या उपनेत्या अनिता बिर्जे यांचे शिवसेनेच्या जडणघडणीच्या कालखंडात मोठे योगदान आहे. बिर्जे यांनी तत्कालीन शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहचवली होती.

दरम्यानच्या काळात शिवसेना फुटली त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर न जात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहणे पसंत केले होते. नंतर त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते पदही मिळाले होते. मात्र, त्यांनी काल उद्धव ठाकरे यांना धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट पकडली.

माझा भाऊ मुख्यमंत्री

काल रात्री ठाण्यातील आनंदाश्रम येथे अनिता बिर्जे यांनी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बिर्जे यांनी माझा भाऊ मुख्यमंत्री आहे, असे विधान करत शिंदेंच्या कामाचे कौतुक केले.

यावेळी बिर्जे म्हणाल्या की, "एकनाथ शिंदे हेच आनंद दिघे यांचा वारसा योग्यपणे चालवत आहेत. ते मुख्यमंत्री म्हणून करत असलेले काम जनतेच्या हिताचे आहे आणि हे लक्षात आल्यामुळेच मी आज शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे."

त्या पुढे म्हणाल्या, "आज माझा भाऊ राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि याचा उपयोग तळागाळातील महिलांच्या कल्याणासाठी झाला पाहीजे म्हणून मी हा निर्णय घेतला आहे."

एकनाथ शिंदे यांची पोस्ट

या पक्ष प्रवेश कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिता बिर्जे यांचे एक्सवर पोस्ट करत स्वागत केले. यावेळी शिंदे म्हणाले, "उबाठा गटाच्या उपनेत्या आणि आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या कट्टर शिवसैनिक अनिता बिर्जे यांनी आज आनंदआश्रमात येऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे साहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला नवीन बळ मिळाले आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: अनधिकृत दर्ग्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन

Jalgaon Politics : सगळ्यांना मामा बनवणारे जिल्हाधिकारी!; गिरीश महाजन यांच्या कोपरखळीने सभागृहात हंशा

Murlidhar Mohol : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी

RRC Recruitment 2025: आनंदाची बातमी! रेल्वेमध्ये 10वी पाससाठी 3115 नवीन भरती जाहीर; सविस्तर माहिती येथे वाचा

SCROLL FOR NEXT