माळेगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेच्या २० व्या हप्त्याचे वितरण देशभरातील ९ कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले. या योजनेतंर्गत एकूण २०,५०० कोटी रुपयांचे थेट हस्तांतरण ही बाब शेतकऱ्यांच्या आर्थिक सशक्तीकरणाचा निश्चितच मोठा टप्पा आहे.