मुंबई

उल्हासनगरातील डंपिंगच्या दुर्गंधीवर बायोसॅनिटायझर-बायोकॅटलिस्ट स्प्रेची मात

दिनेश गोगी

उल्हासनगर : डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचा थर कमी होण्यासाठी व त्यावरील दुर्गंधी हद्दपार करण्याकरिता उल्हासनगर पालिकेने बायोसॅनिटायझरच्या सूक्ष्म दाण्यांसोबतच बायोकॅटलिस्ट-स्प्रेचा वापर करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे डंपिंगच्या दुर्गंधी व धुरामुळे होणारी नागरिकांची घुसमट संपणार असे चित्र दिसू लागले आहे.

उल्हासनगरात म्हारळच्या गावाजवळ असलेले डंपिंग ग्राऊंड ओव्हरफ्लो झाल्याने तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी त्यावर पर्याय म्हणून कॅम्प नंबर 5 मधील खडी मशीन गायकवाड पाडा येथे दुसरे डंपिंग ग्राऊंड तयार केले होते. मात्र, त्यावर ओल्या कचऱ्यासह मेलेली जनावरे टाकण्यात येत असल्याने त्यांच्या जीवघेण्या दुर्गंधीमुळे सभोवताली राहणाऱ्या नागरिकांचा जीव मेटाकुटीला येत आहे. त्यात कचरा पेटवल्यावर त्यातून निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांना विविध आजारांची लागण झालेली आहे. त्यामुळे शिवसेनेसह सर्वपक्षीय नगरसेवक सामाजिक संस्था यांनी डंपिंग ग्राऊंड हटवण्यासाठी मोर्चे उपोषण केली आहेत. मात्र डंपिंगसाठी पर्यायी जागा किंबहूना भूखंड ग्रामीण भागात मिळत नसल्याने पालिका हतबल झाली आहे.

तज्ज्ञ व्यक्तीची मदत

दुर्गंधी आणि धूर यावर मात करण्यासाठी पालिकेने घनकचरा व्यवस्थापन तज्ञ व पर्यावरणचे दांडगे अभ्यासक गुणवंत पाटील यांची मदत घेतली.बायोसॅनिटायझरचे सूक्ष्म दाणे डंपिंगवर टाकल्यास कचऱ्याचा थर कमी होतो.त्यातून खतनिर्मिती होते आणि बायोकॅटलिस्ट स्प्रे मारल्याने दुर्गंधी धूर नाहीसा होतो. याची अभ्यासपूर्ण माहिती गुणवंत पाटील यांच्याकडे आहे. त्यानुसार आयुक्त गणेश पाटील यांच्या निर्देशान्वये गुणवंत पाटील यांनी शहर नियोजन समितीच्या सभापती मीना सोंडे,मुख्य स्वच्छता निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी विनोद केणे, एकनाथ पवार यांच्या उपस्थितीत खडीमशीन डंपिंग ग्राऊंडवर प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांनी बायोसॅनिटायझर व बायोकॅटलिस्ट स्प्रे अग्निशमन दलाच्या गाडीतील पाण्यात मिसळून डंपिंगवर पंपाने फवारणी केली. त्यामुळे दुर्गंधी धूर यावर नियंत्रण मिळत असल्याचे प्रमाण मिळू लागले. हा प्रयोग नित्याने केला जाणार असल्याने दुर्गंधी धुरावर मात होण्याचे चित्र दिसत असल्याचे विनोद केणे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT